Homeविशेषप्रेमाचा दावा फोल? पाचच दिवसांत तरुणीनं बदलला निर्णय; भिगवण प्रकरणाला अनपेक्षित वळण..आमदार...

प्रेमाचा दावा फोल? पाचच दिवसांत तरुणीनं बदलला निर्णय; भिगवण प्रकरणाला अनपेक्षित वळण..आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली झाले होते भिगवन येथे मोठे आंदोलन..

advertisement

अहिल्यानगर दिनांक 25 फेब्रुवारी

भिगवन येथून एका तरुणीला पळवून नेऊन तिचा अपहरण झाल्याची घटना घडली होती मात्र या घटनेत त्यानंतर अनेक ट्विस्ट आले असून मुलीने आपले अपहरण झाले नसून आपण स्वतः प्रियकरा बरोबर पळून आल्याची माहिती प्रसार माध्यमांना व्हिडिओद्वारे दिली होती त्याचप्रमाणे बारामती येथे पोलिसांमध्ये हजर झाल्यानंतर आपले प्रेम असल्यामुळे आपण पळून आलेल्या मुलाबरोबरच राहणार असल्याचं न्यायालयात सांगितले होते.

Oplus_0

दरम्यान हे प्रकरण हिंदू मुस्लिम मध्ये असल्यामुळे संपूर्ण बारामती परिसरात उमटले होते समस्त हिंदुत्ववादी संघटनेने बारामती, दौंड,भिगवण, इंदापूर परिसर बंद पाडून या घटनेचा निषेध केला होता. तर आमदार संग्राम जगताप आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा भिगवन येथे जाऊन पीडित मुलीला परत आणावे याकरिता आंदोलन केले होते आणि ती तरुणी ही लव्ह जिहादची शिकार असून तिला तिच्या कुटुंबियांकडेच द्यावे अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली होती. त्याचप्रमाणे ती दवाखाली असून त्यामुळे ती आपल्या आईकडे येण्यास नकार देत असल्याचे यावेळी ठामपणे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले होते.

हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर गाजले असून आता या मध्ये पुन्हा एक मोठा धक्कादायक खुलासा आला असून या प्रकरणात आज मुलीला इंदापूरच्या कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे हजर करण्यात आलं. यावेळी मात्र मुलीनं आपल्याला आईसोबतच राहायचं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं आधी तिनं प्रियकरासोबत जायचं असल्याचं म्हटलं होतं या साक्षीविरोधात आज तिनं साक्ष बदलल्यानं या प्रकरणात मोठा द्विस्ट आला आहे. कारण यापूर्वी हिंदुत्ववादी संघटनांनी आरोप केला होती की, मुलगी दबावाखाली असल्यानं मुलासोबतच रहायचं असल्याचं म्हणत आहे. पण आता तिनंच आपली साक्ष बदलल्यानं आता ती कोणाच्या दबावाखील बोलत आहे की आधी ती कोणाच्या दबावाखाली बोलत होती, हे पुढील तपासादरम्यान समोर येईल. त्याप्रमाणेच हा खटला पुढे जाईल.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular