अहिल्यानगर दि.५ डिसेंबर
नगर जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांत एका मागून एक राजकीय धक्के बसले. कोण मित्र आणि कोण शत्रू अशी परिस्थिती निर्माण झाली. शत्रू मित्र झाले तर मित्र शत्रू झाले. पक्ष फुटले, घर फुटले. तरीही राजकीय धर्म म्हणून महायुती, महाविकास आघाडीचे प्रयोग सुरू आहेत. आता आणखी एका भूकंपाचा दावा करण्यात येत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांमध्ये एकाहून एक मोठे भूकंप घडले आहेत. त्यात राज्यातील दोन प्रमुख पक्ष फुटले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोन भागात वाटल्या गेली. लोकसभेला अनपेक्षित मध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळाले महायुती मधील अनेक मातब्बर उमेदवारांना लोकसभेत पराभव पत्करावा लागला तर भाविकास आघाडीमधील सर्वसामान्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले असे अनेक उमेदवार लोकसभेत निवडून गेले त्यामुळे लोकसभेला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे विधानसभेत त्याचीच पुनरावृत्ती होईल याच आत्मविश्वासावर मालकास आघाडीमध्ये विधानसभेच्या जागा वाटपामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत रस्सीखेच सुरू होती. मात्र विधानसभा निवडणूक झाली आणि आलेल्या निकालामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. महायुती मधील घटक पक्ष असलेले भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडून आल्यामुळे जवळपास 234 जागा महायुतीच्या घटक पक्ष आणि अपक्षांनी मिळवल्या तर फक्त 45 जागा महाविकास आघाडी मधील घटक पक्षाला मिळाल्या आहेत.
आता राज्यातही महायुती आणि देशातही महायुतीची सत्ता असल्यामुळे विकास कामे आणि विकास कामासाठी लागणारी निधी मोठ्या प्रमाणात सत्ताधारी आमदारांना आणि खासदारांना मिळणार आहे त्यामुळे आता विरोधकांनी करायचे काय असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. विरोधकांनीही महायुतीमध्ये जाण्यासाठी प्रयत्न सुरू केला असून नगर दक्षिण मतदार संघात लोकसभेला महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते जायंट किलर म्हणून खासदारांचा उल्लेख केला गेला होता त्यानंतर विधानसभेत मात्र त्यांना त्यांच्या स्वतःच्या पारनेर मतदारसंघातून आपल्या पत्नीचा पराभव स्वीकारावा लागला थोड्या का फरकाने होईना पराभव झाला तर जामखेड वगळता सर्वच ठिकाणी महा आघाडीचे उमेदवार पराभूत झाले असल्याने आता पुढील पाच वर्षात विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणावा लागेल कार्यकर्ते जिवंत ठेवण्यासाठी सत्ता महत्त्वाची असते तसेच मतदारांना सामोरे जाण्यासाठी काम महत्त्वाचे असते त्यामुळे आता येत्या काही दिवसात राज्यातून अनेक जण महायुतीचे दारे ठोठवणार आहेत तर माहिती मधील भारतीय जनता पार्टीला अनेकांची पसंती आहे. त्यामुळे प्रवेशाबाबत प्राथमिक बैठक दिल्लीमध्ये झाली असून काही दिवसातच पुन्हा एकदा राज्यसह नगर जिल्ह्यात मोठा भूकंप होऊ शकतो अशी खात्रीलायक माहिती हाती आली असून महाराष्ट्रातील सत्तेचा पेच सुटल्यानंतर आता विरोधात असलेले आमदार, खासदार महायुती मध्ये प्रवेश करतील अशी माहिती समोर आली असून यामध्ये नगर जिल्ह्यातही मोठ्या घडामोडी होणार आहे.
मात्र या घडामोडी होत असताना मतदारांनी ज्यांना नाकारून ज्यांना निवडून दिले ते पुन्हा त्याच पक्षात जात असतील तर मतदारांच्या मतांचा उपयोग काय? भावनांचा उपयोग काय ? असाही सवाल समोर येत आहे. तर सत्तेच्या लालसेपोटी निवडून गेलेले उमेदवार स्वतःचा विचार करून पक्ष बदलत असतील तर जनतेच्या भावनांचा आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमाला पायदळी तुडवण्याचे काम नेते करत असतात हेच पुन्हा सिद्ध होईल.