Homeराजकारणमहाविकास आघाडीला कडकडीत डोस देण्यासाठी आता भाजपची १ मे ला मुंबईत सभा

महाविकास आघाडीला कडकडीत डोस देण्यासाठी आता भाजपची १ मे ला मुंबईत सभा

advertisement

मुंबई दि.२८ एप्रिल
भारतीय जनता पक्षाची 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त मोठी सभा आयोजित करण्यात आली असल्याचं भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही ठरवला असून कोरोना नंतर भाजपने एवढा मोठा सोहळा करायचा योजला आहे. हजारो कार्यकर्ते सोमय्या ग्राऊंडवर येणार असून 1 मेच्या सोहळ्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बूस्टर डोस सभा होणार असल्याची माहीती यावेळी शेलार यांनी दिली.

या सभे दिवशी भाजपच्या कार्यकर्त्यांना बूस्टर आणि महाविकास आघाडीला कडकडीत डोस दिला जाणार आहे. पोलखोलमधून आम्ही ज्यांची लक्तरे घेतो आहोत त्यांचा आढावा यावेळी घेणार असल्याचंही शेलार म्हणाले. तसंच कुणी 14 मे ला सभा घेणार आहेत कुणी 1 मे ला सभा घेत आहेत या सर्वांना कडकडित डोस दिला जाईल असही ते यावेळी म्हणाले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular