अहिल्यानगर दिनांक 5 जानेवारी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी परभणी येथे पक्षाच्या उमेदवारांची व पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी निवडणूक प्रचाराबाबत स्पष्ट आणि कडक सूचना दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. बावनकुळे यांनी सांगितले की, निवडणूक पॅनल पद्धतीने लढविली जात असताना कोणत्याही उमेदवाराने केवळ स्वतःपुरताच प्रचार करणे पक्षशिस्तीला धरून नाही. प्रभागातील चारही उमेदवारांनी एकत्रितपणे प्रचार करणे आवश्यक असून, मतदारांकडे जाताना संपूर्ण पॅनलसाठीच मतदान मागावे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. कोणीही उमेदवार वैयक्तिक मतांसाठी स्वतंत्र प्रचार करीत असल्याचे आढळल्यास संबंधित उमेदवाराला कोणतीही तडजोड न करता थेट पॅनलमधून बाहेर काढण्यात येईल, असा कडक इशाराही त्यांनी दिला.

मग दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक तीन मधील उमेदवाराच्या वडिलांचा एक ऑडिओ व्हायरल झाला आहे यामध्ये फक्त आपल्या मुलाला निवडून द्या आणि फक्त कमळ दाबा इतर तीन जणांचा प्रचार बाबत ते काही बोलत नाही असा प्रचार एका उमेदवाराचे वडील करत आहेत. त्यामुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेला इशारा अहिल्यानगर मध्ये लागू पडेल का ? अशी चर्चा आता मतदारांमध्ये सुरू आहे.





