पारनेर दि. २४ मे
पारनेर तालुक्यातील भाजचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून माजी मंत्री आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत बुधवारी २५ मे रोजी दुपारी तीन वाजता पारनेर येथे संघटनात्मक बैठक आणि मार्गदर्शन शिबिर होणार आहे.भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिके वरून सोशल मीडियावर चांगलेच रान पेटले आहे.
अहमदनगर दक्षिणचे खा. सुजय विखे आणि भाजपचे नेते सुजित झावरे यांचे नाव आणि फोटो गायब असून त्यांना निमंत्रण पत्रिकेत स्थान देण्यात आले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ही पत्रिका फेसबुक वर टाकल्या नंतर या पोस्ट खाली कार्यकर्त्यांचे शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.खा. सुजय विखे आणि सुजित झावरे भाजप सोडले का असे प्रश्न कार्यकर्ते आता विचारू लागले आहेत ही गोष्ट महागात पडेल अशाही काही पोस्ट पडल्या असून आता या विषयावर कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चर्चा सुरू आहे.