मुंबई दि.,८ डिसेंबर
भारतीय जनता पार्टीचे नगर तालुक्याचे माजी तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा मुंबई येथे दाखल झाला आहे.
याबाबत हकीगत अशी की मुंबई येथील खेळाडू असलेला सुमित बबन डबे हा तरुण आपल्या वडिलांचा कपडे विकण्याचा व्यवसाय मदत करत होता तसेच तो बास्केटबॉलपटू असून 2016 मध्ये पुण्याला बासस्केट बॉलच्या स्पर्धेसाठी
गेलो होता , तेव्हा तेथे माजी गृहमंत्री राम शिंदे यांचे सचिव मनोज राधाकृष्ण कोकाटे यांच्यासोबत सुमित डबे याची ओळख झाली त्यावेळी मनोज कोकाटे त्याने सुमित याचा मोबाईल नंबर घेऊन त्याच्याशी जवळपास आठवड्यावर संभाषण केले होते . त्यानंतर मनोज कोकाटे याने सुमित यास तू बासस्केट बॉल चांगला खेळतो माझ्या साहेबांना सांगून तूला मी तलाठी या पदाची नोकरी नाशिक, पुणे किंवा रायगड या ठिकाणी मिळवून देतो असे सांगितले, पण त्यासाठी तुला 500000/रूपये रक्कम द्यावी लागेल, असे ते म्हणाला.
यावर सुमित याने एवढे पैशाची जमवाजमा करण्यासाठी मला थोडा वेळ द्या असे सांगून त्यानंतर दोन महिन्यांनी मनोज कोकाटे यांनी दिलेल्या अहमदनगर येथील सेंट्रल बँकेचे ओम साई इलेक्ट्रीकल्स यानावाने असलेले खाते क्रमांक 3456115897 यावर सुमित डबे याच्या वडिलांनी बँक ऑफ महाराष्ट्राचे खाते क्रमांक 20009354815 यावरून मनोज कोकाटे याच्या वर नमुद सेंट्रल बॅक (अहमदनगर शाखा) खाते क्रमांक 3456115897 यावरती 400000/ रूपये पाठविले. त्यानंतर दोन महिन्यांनी मनोज कोकाटे यांनी मला उरलेले 100000/ रूपये कॅश व माझी शिक्षणाची कागदपत्रे घेवून अहमदनगर येथे बोलवले होते. अहमदनगर येथील भिडे चौकात आयएचएफएल नावाच्या ऑफिसमध्ये मनोज कोकाटे यास रोख 100000/ रूपये आणि शैक्षणिक कागदपत्रे दिली होती. त्यावेळी मनोज कोकाटे यांने सुमित यास तू चार ते सहा महिन्यात तू नोकरीला लागून जाशील असे सांगितले.
मात्र त्यानंतर सहा महिन्यांनी सुमित याने मनोज कोकाटे यांना मोबाईल वरून कॉल केला असता आपल्या नोकरी बाबत विचारणा केली असताना अजुन थोडा वेळ लागेल अशी उडवा उडवायची उत्तरे देऊन फोन बंद केला होता. धन सन 2016 आणि 2017 या संपूर्ण वर्षात अनेक वेळा फोन करूनही मनोज कोकाटे याने सुमित यास उडवा उडवी ची उत्तरे दिली.त्यानंतर सन 2017 च्या अखेरीस मनोज कोकाटे यांने सुमित यास फोनद्वारे सांगितले कि, तुझ काम साहेबांनी कॅन्सल केल आहे, तू तूझे कागदपत्र आणि पैसे घेवून जा.
पैसे आणि कागदपत्रे घेण्यासाठी सुमित अहमदनगर येथे आला असता पुन्हा भिडे चौक येथे मनोज कोकाटे याची भेट झाली त्यावेळी मनोज यांनी सांगितले होते की शुक्ला साहेब यांचेकडे मी पैसे दिले असुन तू त्यांचा नंबर घे व त्यांच्याकडे पैशाबाबत विचारणा
कर. त्यानंतर मी मनोज यांनी दिलेल्या शुक्ला यांचा मो.नं. 8830984697 यावरती फोन करून,
मनोज कोकाटे यांनी दिलेल्या पैशाबाबत विचारणा केली. त्यावेळी शुक्ला यांनी मला मी बाहेर गावी
असल्याचे सांगितले, तू मला नंतर फोन कर, तूला तूझे पैसे मिळतील. त्यानंतर मी दोन ते तीन महिने शुक्ला यांच्या फोनची वाट बघून, त्यांना फोन केला असता त्यांचा फोन स्वीच ऑफ लागत होता. मनोज कोकाटे यांनी देखील मला फोनवरती ब्लॉक केले होते. त्यानंतर मी त्या दोघांनाही टेक्स मेसेज केला त्याचाही त्यांनी रिप्लाय दिला नाही. तरी मनोज कोकाटेने मला तलाठीची नोकरी देतो असे आश्वासन देवून, माझ्याकडून 500000/ रूपये घेवून सन 2016 ते सन 2023 पर्यंत, मला नोकरी व त्याच्याबदल्यात घेतलेले पैसे परत न देता माझी फसवणूक केली. असल्याचे तक्रार सुमित डबे याने माटुंगा पोलीस ठाण्यात दिली आहे यावरून मनोज कोकाटे यांच्या विरुद्ध भादवी कलम ४०६.४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.