अहिल्यानगर दिनांक 24 डिसेंबर
अहिल्यानगर महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची लगबग सुरू आहे. अनेक जण आपल्याला उमेदवारी मिळेल या अपेक्षेने गेल्या दोन महिन्यांपासून तयारी करत आहेत. मात्र आता जशी जशी निवडणूक अंतिम टप्प्यात येत चालली आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार उमेदवारी बाबत वरिष्ठांकडे चाचपणी करत आहेत. सर्वच पक्षात मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार झाल्यामुळे अनेकांना वरिष्ठांनी शब्द दिले असल्यामुळे आता पक्षश्रेष्ठींनाही आता उमेदवारी कोणाला द्यायची याचा पेच निर्माण होत असताना आता आपल्याच पक्षातील प्रतिस्पर्ध्याला उमेदवारी दिली गेल्याची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टीच्या एका उमेदवारांनी सोशल मीडिया पोस्ट करत आपल्यावर अन्याय कसा झाला याचा पाढा वाचला आहे.
ज्या उमेदवाराला भाजपा पक्षाची उमेदवारी देण्यात येणार आहे त्याच्या बाबत ही पोस्ट टाकण्यात आली आहे.

गेल्या वीस वर्षांपासून आपण प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवारीसाठी मागणी करत आहे. पक्षाचे काम अनेक वर्षांपासून करत असतानाही निष्ठावंत म्हणून आपला उमेदवारीचा हक्क असताना उमेदवारी डावण्यात आल्याचं या सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटले गेले आहे.एवढेच नव्हे तर 2014 च्या निवडणुकीत एका पक्षाच्या मोठ्या पदाधिकाऱ्याने आणि लोकसेवकाने आपली उमेदवारी 40 लाख रुपयांना विकली असल्याचा आरोपही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली असल्यासही या पदाधिकाऱ्याने सांगितले असून 2019 मध्ये सर्व वर्तमानपत्रांना आणि पक्ष श्रेष्ठ नाही त्याबाबत अहवाल पाठवला असल्याचं सांगण्यात येत आहे. 2019 मधील महापालिका निवडणुकीतही पक्षाकडून उमेदवारांसाठी आलेला निधीही उमेदवारांना दिला नसल्याची माहिती पोस्टमध्ये देण्यात आली आहे.तसेच लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात विरोधी उमेदवाराला माहिती देऊन मदत केल्याचा या पोस्टमध्ये सांगण्यात आला आहे. तसेच अनेक बँक घोटाळे करून व्यापारी वर्गालाही त्रास देण्यात सांगण्यात आले असून आपल्यावर अन्याय होत असल्याचे भावना या पोस्टमध्ये करण्यात आली असून ही पोस्ट दादांना पाठवली आहे असे दिसून येत असून नेमके दादा कोण आणि आता याबाबत भाजप पक्षश्रेष्ठी गांभीर्याने पाहणार का हा एक चर्चेचा विषय झाला आहे. आता प्रभाग क्रमांक 11 मधून भाजपने कोणा कोणाला उमेदवारी फायनल केली त्यामध्ये या पोस्टमध्ये आरोप केलेला उमेदवार नेमका याची चर्चा आता कट्ट्या कट्ट्यावर सुरू आहे.





