अहिल्यानगर दिनांक 6 जानेवारी
अहिल्यानगर महापालिका निवडणूक अंतिम टप्प्याकडे जात असताना आता उमेदवारांनी आपले चिन्ह आणि आपला अनुक्रमांक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.
प्रभाग क्रमांक तीन मधील भाजपा – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उषा नलवडे, ज्योती गाडे, गौरी बोरकर आणि ॲड. गंधे ऋग्वेद यांच्या पॅनलने प्रचारात मुसंडी मारली असून चार टप्प्यांमध्ये त्यांच्या पॅनलचा प्रचार सुरू आहे.

चार उमेदवार मतदारांच्या भेटी घेत असतानाच दुसरी टीम त्याच भागातील नागरिकांचे फोन नंबर तसेच त्यांचे मतदार यादीतील नाव शोधून देण्याचे काम सुरू असते तर तिसऱ्या टप्प्यात पुरुष मंडळी प्रभागातील इतर भागात आपापल्या पद्धतीने प्रचार करत असताना अनुक्रमांक आणि चिन्ह यावर भर देताना दिसत आहेत. त्यामुळे एका भागातून उमेदवार गेल्यानंतर त्यामागे पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यानंतर उमेदवारांच्या कुटुंबातील पुरुष मंडळी मतदारांच्या भेटीला जात असल्यामुळे मतदाराला प्रत्येक उमेदवारांची दिवसभरात तीन ते चार वेळा विविध मार्गाने भेटी होत असल्याने भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवारांनी प्रचारात मुसंडी घेतल्याचं दिसून येत आहे.
अजिंक्य बोरकर आणि अमोल गाडे यांनी केलेल्या मागील पाच वर्षाच्या कामाच्या जोरावर तसेच ज्येष्ठ नगरसेविका उषा नलवडे यांनीही काही वर्षांपूर्वी या भागाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळी केलेल्या कामाचे मोल म्हणून मतदार उषा नलवडे यांच्या पाठीशी उभा राहताना दिसत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक महेंद्र भैय्या गंधे यांची पुढची पिढी राजकारणात आली असून ऋग्वेद गंधे यांच्या रूपाने चौथा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.
चारही उमेदवार सुशिक्षित असल्यामुळे आणि बोरकर गाडे नलवडे यांनी प्रभागात केलेल्या विकास कामांमुळे मतदारांनी या पॅनलला पसंती दिल्याचं उमेदवार प्रचार करताना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे दिसून येत आहे.





