Homeशहरभाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्माचे पोस्टर अज्ञातांनी पादचारी मार्गावर चिकटवले. पोलीस फोर्स...

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्माचे पोस्टर अज्ञातांनी पादचारी मार्गावर चिकटवले. पोलीस फोर्स घटनास्थळी दाखल

advertisement

अहमदनगर दि.१० जून
भारतीय जनता पक्षाच्या (BJP) प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यांचे गंभीर परिणाम आखाती देशात पाहायला मिळाले. त्यानंतर भारतात विविध ठिकाणी नुपूर शर्मा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आली भारतीय जनता पार्टीने सुद्धा सर्व परिस्थिती पाहता पक्षाच्या प्रवक्त्या नुपुर शर्मा यांची हकालपट्टी केली आहे मात्र आता हे प्रकरण शांत होण्यास तयार नसून अनेक ठिकाणी नुपूर शर्मा यांच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत. शुक्रवारी दुपारच्या नमाज झाल्यानंतर सोलापूर,औरंगाबाद या ठिकाणी अनेक मुस्लीम बांधवांनी मोर्चे काढून नुपूर शर्मा यांना अटक करावी अशी मागणी केली आहे.

तर अहमदनगर जिल्ह्यातही अहमदनगर बंदचे आवाहन करण्यात आले होते या बंदला अहमदनगर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. दुपारी साडे चारच्या दरम्यान नगर शहरातील रामचंद्र खुंट ते जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरच भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपुर शर्मा यांचे पोस्टर काही अज्ञातांनी चिटकली होते जेणेकरून या पोस्टरवरून दुचाकी वाहने आणि नागरिक पाई चालू शकतील. ही माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी रस्त्यावर चिटकलेली पोस्टर काढून टाकले आहेत. ज्या कोणी अज्ञात लोकांनी ही पोस्टर लावले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular