मुंबई दि.२७ जून
राज्यातील सत्ता स्थापनेच्या घडामोडी आता वेग घेऊ लागल्या असून भारतीय जनता पार्टीने सर्व आमदारांना मुंबई येथे बोलावले आहे. सोमवार संध्याकाळपर्यंत सर्व आमदार मुंबईपर्यंत पोहोचतील अशी माहिती मिळते आहे.विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांच्या अध्यक्षतेखाली भापच्या कोअर कमिटीची बैठक झाली असून मविआ सरकारवर अविश्वास ठराव मांडायचा का नाही किंवा अजून काही पर्याय आहेत। का या बाबत बैठकीत चर्चा झाली .भाजपचे आमदार संध्याकाळपर्यंत मुंबईत येतील अशी शक्यता आहे.
अविश्वास ठराव मांडायचा असल्यास भारतीय जनता पार्टी चे सर्व आमदार उपस्थित राहणे गरजेचे आहे जर बंडखोर एकनाथ शिंदे यांचे आमदार सभागृहात अनुपस्थित राहिले तर भारतीय जनता पार्टी संख्येनुसार बाजी मारू शकते त्यामुळे आता भारतीय जनता पार्टी नेमकी काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता लागली असून याबाबत सध्या भारतीय जनता पार्टीत कायदेशीर सल्ले घेऊन रणनिती आखली जात आहे.राज्यपाल यांचा आधार घेऊन अधिवेशन बोलणे आणि अविश्वास ठराव मांडून सरकार पाडणे अशीही शक्यता आहे.
बंडखोर शिंदे गटाचे एकोणचाळीस आमदार गैरहजर राहिल्यास बहुमताचा आकडा 125 वर येईल आणि याचाच फायदा घेऊन भाजपकडे बहुमताचे संख्याबळ असल्याने भाजप हा डाव जिंकू शकतो