अहिल्यानगर दिनांक 9 जून
“मोदी सरकारची यशस्वी ११ वर्षे पूर्ण होत असल्याने अहिल्यानगर येथे बंधन लॉन्स या ठिकाणी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले होते. या कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
मात्र नगर शहरातील काही पदाधिकाऱ्यांनी या कार्यशाळेकडे पाठ फिरवल्यामुळे नुकत्याच झालेल्या शहर जिल्हाध्यक्ष पद निवडी मुळे एखादा गट नाराज आहे का अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.
नगर शहर जिल्हाध्यक्ष निवडीवरून काही दिवसांपासून मोठी रस्सीखेच दिसून आली होती. या पदाकरता माजी महापौर बाबासाहेब वाकळे, सचिन पारखी, अनिल मोहिते, या नावांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत मोठी रस्सीखेच दिसून आली होती अखेर अनिल मोहिते यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खाजगी मध्ये नाराजी व्यक्त केले आहे तर काही कार्यकर्त्यांनी या निवडीचे स्वागत करून भाजपने खऱ्या आणि जुन्या कार्यकर्त्याला न्याय दिला अशी भावना व्यक्त केली होती.
आज झालेल्या कार्यशाळेमध्ये मात्र नगर शहरातील काही निवडक पदाधिकारी त्यामध्ये माजी शहर जिल्हाध्यक्ष आणि सर जिल्हाध्यक्षांच्या शर्तीत असलेले काही पदाधिकारी आणि त्यांच्या समर्थक या बैठकीला अनुपस्थित असल्याने अजूनही भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष पदावरून एक गट नाराज आहे असं दिसून आलंय.
राज्यात सध्या विविध ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोदी सरकारला अकरा वर्षे पूर्ण झाल्यामुळे मोठे कार्यक्रम आयोजित करून उत्सव साजरा करण्यात येत आहे. यासाठी सर्व जुन्या नवीन पदाधिकाऱ्यांना घेऊन विविध ठिकाणी कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.
आज नगर शहरात झालेल्या कार्यशाळेला भाजपा महिला युवक संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर अनेक जुने आणि नवे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी व्यासपट्यावर पाहायला मिळाले.
नवनिर्वाचित शहर जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीचा हा पहिलाच कार्यक्रम होता. काही दिवसातच महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे त्यामुळे आता नवनिर्वाचित अध्यक्षांसमोर शहरातील नवीन जुन्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची नाळ बांधून भाजपची ताकद वाढवण्याचं मोठं आव्हान असणार आहे.