Homeविशेषप्लॉट घेताना देताना सावधान ब्लॅकमनीच्या फांद्यात अनेकांना लागला चुना, तर बंटी बबलीने...

प्लॉट घेताना देताना सावधान ब्लॅकमनीच्या फांद्यात अनेकांना लागला चुना, तर बंटी बबलीने केला धिंगाणा!

advertisement

अहमदनगर दि.१ मे (सुशील थोरात)

ताबा सादर चालू झाल्या पासून अनेक धक्कादायक गोष्टी आता समोर येत असून ताब्या सह सर्वसामान्यांना प्लॉट विक्री खरेदी मध्ये कसे लुटले जाते तसेच फसवले जाते असे अनेक उदाहरणं समोर आले आहेत.

सध्या जमिनीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मात्र सरकारी दर हा फार कमी असतो त्यामुळे जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात काळा पैसा( ब्लॅक मनी) आणि सरकारी दराने दिला जाणारा पैसा यामध्ये मोठी तफावत असते. सरकारी किमतीमध्ये देण्यात येणारी रक्कम ही खरेदी खतामध्ये नमूद केले जाते. मात्र उरलेली रक्कम ही काळा पैसा अर्थात ब्लॅक मनी याचा कुठेही उल्लेख नसतो . याचाच फायदा घेऊन  या ब्लॅक मनिला हात वर केल्याचा प्रकार घडत आहेत. अनेकांनी चांगल्या चांगल्या लोकांना या ब्लॅक मनी च्या माध्यमातून चांगला चुना लावला आहे. या ब्लॅक मनीच्या कुठेच उल्लेख नसल्याने आणि हा पैसा दाखवायचा कसा या कारणामुळे तेरी भी चूप आणि मेरी भी चुप असाच काहीसा प्रकार घडत आहे.

तर एक बंटी बबली (चित्रपटातील नाव आहे) जोडीने कहरच केला आहे. ज्या ठिकाणी मोठ्या इमारती अथवा बांधकाम व्यावसायिक ईमारत बांधण्या आधी साफसफाईचे काम सुरू करतो तेव्हा ही जोडी त्याठिकाणी जाते आणि त्या ठिकाणचे फोटो वगैरे काढून देखावा केला जातो. या जागेवर आमचा हक्क आहे चला पोलीस स्टेशन मध्ये जाऊ असे म्हणत ही जोडी थोड्यावेळ धिंगाणा घालते त्यामुळे त्याठिकाणी असलेले कामगार आणि मालक चांगलं हादरून जातात तिथूनच फोनवर कायदे तज्ञांशी बोलनी केल्याचे नाटक केले जाते काही माणसे काही वेळाने त्या ठिकाणी येतात काम बंद करायला सांगतात काही कागदपत्रे हातात घेऊन आपसात चर्चा करतात ( बंटी बाबलीचे जोडीदार असतात) त्यामुळे मालक हादरून जातो आणि मग तडजोड करून जे भेटेल ते घेऊन जोडी निघून जाते मात्र जेव्हा मालकाला सर्व प्रकार समजतो तेव्हा वेळ गेलेली असते.

औरंगाबाद रोडवरील एका सर्व्ह मध्ये तर एकच प्लॉट तीन ते चार जणांना विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे याबाबत सध्या न्यायालयात वाद चालू असून मात्र तरीही फक्त बॉण्ड पेपर वर या ठिकाणी प्लॉटची खरेदी विक्री रात्रीतुन होत असल्याचं समोर आलं आहे एका प्लॉटचे अनेक मालक झाल्याने या ठिकाणी  गोंधळ उडाला आहे. एक राजकीय व्यक्ती या मध्ये सामील असल्याचं बोललं जातंय गोर गरीब जनतेला प्लॉटचे स्वप्न दाखवून त्यांच्या स्वप्नाला सुरुंग लावण्याचे काम त्याने केली असल्याची चर्चा आहे.

तो कोण ? वाचत राहा..

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular