अहमदनगर दि.२३ जुलै
काँग्रेस पक्ष संपत आली आहे काँग्रेस आता आपल्या अस्तित्वासाठी झगडत असून काँग्रेसचे आंदोलन केवळ त्यांना माहिती आहे. त्यामुळेच काँग्रेसचे बाळासाहेब
थोरात बेछूट आणि बेजबाबदार आरोप करत आहेत. सत्ता गेल्याच्या वैफल्यग्रस्ततेतून ते आरोप करत आहेत, थोरात यांना सत्ता गेल्याचे दुःख झालेले दिसते, असा टोला भाजप नेते माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी लगावला.
काँग्रेस पक्ष सत्तेत असताना किती वाढला आणि किती जणांची अर्थप्राप्ती वाढली असा टोलाही विखे यांनी लगावला.सत्ता गेल्यामुळे आता काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आंदोलने करू लागली आहे. महाविकास
आघाडी सरकार केवळ सत्तेसाठी स्थापन झालेले होते.
भाजप सेना हे जनतेच्या मनातील सरकार आहे. ते लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नगर शहरात ते पत्रकारांशी बोलत होते