अहिल्यानगर दिनांक १८ फेब्रुवारी
नगर शहरातील बोल्हेगाव परिसरातील गांधींनगर येथे सर्व्हे नंबर 69/2 प्लॉट नं 136 वरील जागेवर असलेल्या पत्रा शेड आणि अनाधिकृत मशीद बांधलेली आहे हे काम बेकायदेशीर असून अतिक्रमण झाले असल्याने ते काढून टाकण्यात यावे अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.अशा मागणीचे निवेदन अहिल्यानगर महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांना देण्यात आले आहे.
नगर शहरा जवळ असणाऱ्या बोल्हेगाव परिसरातील गांधींनगर येथील सर्व.नं 69/2 प्लॉट नं 136 या जागेवरील व रोडवरील पत्रा शेड व अनाधिकृत मशीद बाधकाम विना परवानगी अतीक्रमण हटवण्याबाबतची मागणी होत असून या ठिकाणी अनाधिकृतपणे मशीद व मोठे पत्रा शेड 100×100 जागेत बांधण्यात आले आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लवजीहादचे प्रकार तसेच गो तसकरी आणि बाहेरील जमात रात्री अपरात्री या ठिकाणी वास्तव्यास येत असतात बांगलादेशी मुस्लिम येथे आश्रयाला येत असल्याची शंकाही या परिसरातील नागरिकांना आहे. त्यामुळे अहील्यानगर शहराला धोका होण्याची शक्यता आहे. तसेच या परिसरात राहणाऱ्या हिंदु समाजातील सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करणे त्यांच्यावर दहशद करून दमदाटी करण्यात येते त्यामुळे हे अतिक्रमण व अनाधिकृत बाधकाम काढून टाकावे. अन्यथा सकल हिंदू समाजाच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.