अहिल्यानगर दिनांक 7 डिसेंबर
तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये होणाऱ्या मोटारसायकल चोरी गुन्ह्यांचा तपास करत असताना तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमी नुसार सराईत मोटार सायकल चोर मनोज गोरख मांजरे याने तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील सावेडी आणि तपोवन रोड भागातून मोटरसायकलची चोरी केली आहे. त्यानुसार तोफखाना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांच्या सह पोहेकॉ दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाठ, अहमद इनामदार, भानुदास खेडकर, सुधीर खाडे, सुरज बावळे, गणेश धोत्रे, पो.ना वसिम पठाण, पो.कॉ सुमित गवळी, शिरीष तरटे, पो.कॉ सतिष त्रिभुवन, दत्तात्रय कोतकर, बाळासाहेब भापसे, सतिष भवर, संदिप गि-हे, राहुल म्हस्के यांच्या पथकाने मनोज गोरख मांजरे यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे चोरी गेलेल्या मोटार सायकल बाबत विचारपुस केली असता त्याने एक महिन्यापुर्वी सावेडी, तपोवन या परिसरातुन बुलेट व इतर मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली तसेच चोरलेल्या मोटरसायकली घराजवळच लपवले असल्याची माहिती दिली.
तोफखाना पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी जावुन त्याच्याकडुन (१) १,२५,०००/- रु किं. चे रॉयल इनफिल्ड कंपनीची क्लासिक ३५० EFI
मॉडेल असलेली लाल रंगाची तिचा क्र. एम एच १६, सी. डब्ल्यु ८३२४, तिचा इंजिन नंबर U३५FMD०६७५२३ व चेसी नंबर ME३U३S५F२MD००३०६० असा असलेली जु. वा. कि. अं (२) १,२५,०००/- रु किं.ची रॉयल इनफिल्ड कंपनीची क्लासिक मॉडेल असलेली पांढ-या रंगाची बुलेट तिचा रजि नं. एम एच १६, बी.पी. १५९० मो.सा, तिचा इंजिन नं. U३५१FL ०४९५९७
चेसी नं.ME३U३S५C१FL३३०९१४ असा असलेली जु.वा. कि. अ (३) २५,०००/- रु किं.ची एक टि.व्ही.एस कंपनीची रायडर मॉडेलची लाल रंगाची मो.सा तिचा रजि नं. एम एच १७, सी. क्यु २६१३ तिचा इंजिन नं. AF९LM१५०२४५६, चेसी नं.
MD६२५AF९२M१L० २४८४ असा एकुण ३,९०,०००/- रु किं.च्या तीन महागड्या मोटार सायकल हस्तगत केल्या आहेत
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सुचना मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या गुन्हे शोध पथकातील पो.उप.नि श्री. शैलेश पाटील, पोहेकॉ दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाठ, अहमद इनामदार, भानुदास खेडकर, सुधीर खाडे, सुरज बावळे, गणेश धोत्रे, पो.ना वसिम पठाण, पो.कॉ सुमित गवळी, शिरीष तरटे, पो.कॉ सतिष त्रिभुवन, दत्तात्रय कोतकर, बाळासाहेब भापसे, सतिष भवर, संदिप गि-हे, राहुल म्हस्के यांनी केला असुन या गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.कॉ अहमद इनामदार हे करत आहे.