अहमदनगर दि.१३ मे
शहरात नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने आयुक्त शंकर गोरे यांना देण्यात आले. तर सीसीटिव्ही कॅमेरे केंव्हा बसवणार त्याचा खुलासा करण्याचा आग्रह धरण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरजिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे, राष्ट्रवादी ओ.बी.सी.चे अमित खामकर, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे महिला अध्यक्षा साधनाताई बोरुडे, शहनवाज शेख, अब्दुल रऊफ खोकर, वसीम शेख, शाहरुख शेख, सय्यद सोहेल आदी उपस्थित होते.
अनेक गुन्हे उघड होण्यासाठी व चुकीच्या प्रकारांना अळा घालण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेरे प्रभावी ठरत आहे. शहरात समाजकंटकांकडून जातीय द्वेष पसरवून अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहे. तर सध्या वाहन चोरी, भुरट्या चोर्या, महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र ओढून नेणे असे प्रकार घडत आहे. महिलांची देखील छेडछाडीचे प्रकार घडत आहे. अशा प्रकारांवर निर्बंध आनण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेर्यांचा उपयोग करुन समाजकंटक व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींना सहज पकडले जाऊ शकत असल्याचे स्पष्ट करुन, शहरात नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने सीसीटिव्ही कॅमेरे कधी बसविणार याचा खुलासा करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
शहरातील प्रमुख चौक, बाजार पेठ, धार्मिक स्थळच्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली. असुन आयुक्त शंकर गोरे म्हणाले की सीसीटिव्ही कॅमेरे हा विषया अतिशय महत्त्वाचा मांडला आहे. परंतु याला मोठा निधी लागणार असुन फक्त महानगर पालिका प्रशासन हे निधी उपलब्ध करू शकत नाही. पण शहराचे आमदार संग्राम जगताप व पालक मंत्री हसन मुश्रीफ यांचे माध्यमातून जिल्हा समिती (DPDC) चे माध्यमातून हा निधी लवकरच उपलब्ध करून हे प्रशन लवकरात लवकर मार्गी लावण्याचा खुलासा केला.