Homeक्राईमकॅफेच्या नावाखाली अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या गोल्ड स्टार कॅफे,लव्ह...

कॅफेच्या नावाखाली अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या गोल्ड स्टार कॅफे,लव्ह बर्ड कॅफे, हंगरेला कॅफे चालकांवर तोफखाना पोलिसांची कारवाई… कॅफेच्या नावाखाली छोटे छोटे कंपार्टमेंट करून सुरू होते नको ते चाळे

advertisement

अहिल्यानगर दि.11 नोहेंबेर
गाळ्यामध्ये प्लायवुडचे कंम्पार्टमेंट करून शाळा, कॉलेजमधील मुला-मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणाऱ्या तीन कॅफेंवर तोफखाना पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी तीनही कॅफे चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पंपिंग स्टेशन रोड, ताठे नगर येथे गोल्ड
स्टार कॅफे, द्वारकाधीश कॉप्लेक्स, श्रीराम चौक य
येथे लव्ह बर्ड कॅफे, पारिजात चौक, गुलमोहररोड वरील हंगरेला कॅफे या ठिकाणी कॉफी शॉपचा
बोर्ड लाऊन कुठलेही कॉफी अथवा खाद्य पदार्थ
विक्रीसाठी न ठेवता लाकडी कंपार्टमेंट तयार
करून मुला-मुलींना बसण्यासाठी व अश्लील व
चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्याची
माहिती पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांना ब
मिळाली होती. त्यानुसार तीनही ठिकाणी तोफखाना पोलिस ठाण्याच्या पथकाने छापे टाकून कारवाई केली.

कॉफीशॉप मध्ये दर्शनी भागात कॉफीशॉपचा परवाना नव्हता. कॉफी बनविण्यासाठी लागणारे साहित्य, गॅस किंवा इतर साहित्य नव्हते. या ठिकाणी अश्लील चाळे
करण्यासाठी आडोशासाठी लावण्यात आलेले पडदे
तात्काळ काढून टाकण्यात आले. मुला-मुलींना
तोंडी समज देऊन सोडण्यात आले.

या प्रकरणी गोल्ड स्टार कॅफेचा मालक
ओंकार कैलास ताठे , लव्ह बर्ड कॅफेचा चालक ऋषिकेश सखाराम निर्मळ , हंगरेला कॅफेचा चालक ओमकार दत्तात्रय कोठुळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १२९, १३१ (क) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कॉलेज, क्लासेसला जाणाऱ्या मुला मुलीच्या
नातेवाईकांनी आपल्या पाल्याच्या वर्तनुकीवर
बारकाईने व जबादारीने लक्ष ठेवावे. टवाळखोर व सार्वजनिक ठिकणी बेशिस्त वर्तनुक करणारी तरुण आढळुन आल्यास तोफखाना पोलीस स्टेशनकडून त्यांच्यावरकठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी केले आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular