अहिल्यानगर दिनांक १० जानेवारी :
कॉफी शॉपच्या नावाखाली मुला मुलींना अश्लील चाळे करण्यास जागा उपलब्ध करून देणाऱ्या गुलमोहर रोड वरील पारिजात चौकातील कॅफेवर तोफखाना पोलिसांनी बुधवारी दुपारी छापा टाकत कारवाई केली. याप्रकरणी कॅफेचालक ओंकार दत्तात्रय कोठुळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावेडी उपनगरात गुलमोहर रोडवर पारिजात चौक येथील हंगरे ला या कॅफेत चहा पाणी अगर खाद्यपदार्थ न ठेवता आत पडदे लावून सोफे बसवून तरुण तरुणींना अश्लील चाळे करण्याकरिता जागा उपलब्ध करून देत असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तुफान पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकला असता त्या ठिकाणी लाकडी कंपार्टमेंट बनवून बाहेरून पडदे लावून आतमध्ये बसण्यासाठी सोपे ठेवून मुला-मुलींना बसण्यासाठी व अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सोय करण्यात आल्याचं दिसून आले या आधीही यावर पोलिसांनी छापा टाकलेला आहे मात्र तरीही काही दिवसांनी पुन्हा याच कॅफेत तोच प्रकार सुरू होता