HomeUncategorizedभाग ५ कॅफे हाऊस... अंधुक उजेडातलं भीषण सत्य ... कॅफेस शॉप वर...

भाग ५ कॅफे हाऊस… अंधुक उजेडातलं भीषण सत्य … कॅफेस शॉप वर पोलिसांनी धाड टाकून उपयोग नाही तर आता पालकांनाच आपला मोर्चा कॉफे शॉपकडे वळावावा लागेल…. पालकांनो मुलांचे बेस्ट फ्रेंड व्हा…नाहीतर व्हाट्सअप विद्यापीठाची पिढी भविष्य कुठे नेऊन ठेवेल सांगता येत नाही…

advertisement

अहमदनगर दि.१० नोव्हेंबर

कॅफे शॉप मध्ये बिघडणारी पिढी याबाबत गेल्या चार एपिसोड मधून अंधुक प्रकाशात नेमकं काय चालतं याबद्दल सविस्तर माहिती दिल्यानंतर या कॉफी शॉप च्या विळख्यातून ही पिढी लवकर सुटली तर भविष्य नक्कीच चांगले होईल तर आता विविध उद्यान आणि लॉज च्या आसपास ही पिढी घुमत असल्याचं चित्र पाहायला मिळते अनेक उद्यानामध्ये तर रात्रंदिवस ही पिढी एकांत शोधत फिरत असते.

अनेक कॉफी शॉप मध्ये तर मुलांना आणि मुलींना हुक्का पिण्यासाठी आकर्षित करण्यासाठी विविध सवलती दिल्या जातात आणि या सवलतींच्या आहारी जाऊन मुलं-मुली हुक्का ओढतानाचे चित्र कॉफी शॉप मध्ये पाहायला मिळतं. कॉफी शॉप चालक आपला स्वतःचा व्हाट्सअप ग्रुप बनवून जे नियमित ग्राहक असतात अशा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रोज काही ना काही नवीन सवलती देऊन त्याचा भडिमार व्हाट्सअप च्या माध्यमातून केला जातो आणि यामुळेच एकमेकांच्या संगतीने कॉफी शॉप मध्ये जाण्याची रांगच लागते.

आजकालची व्हॉट्सअॅप विद्यापीठातील युवकांची व युवतींची ही पुढारलेली पिढी अशा गल्लोगल्ली असलेल्या कॅफेमधून बिघडत असणं ही पालकांसाठी चिंतेची बाब असली पाहिजे. आम्ही अज्ञानी व पुढची पिढी फारच ‘स्मार्ट’ आहे, असे सतत गोडवे गाणारे आजी-आजोबा असोत की आई- वडील; त्यांच्यासाठी अशा कॉफी शॉप्सना भेट देण्याच्या सहली आयोजित करण्याची वेळ आली आहे. टीका करून व पोलिसांच्या धाडी टाकून हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी वयात येणाऱ्या मुलांबरोबर पालकांना थोडातरी वेळ घालवावा लागेल. आयुष्यात
चांगलं आणि वाईट यातला फरक ओळखायला आपल्या कृतीतून आपल्या पुढच्या पिढीला शिकवावं लागेल. घरातल्या मुला-मुलींशी नियमित संवाद साधून
त्यांच्यासोबत वेळ घालवावा लागेल. आयुष्याचे प्रश्न,
जीवनातील आव्हानं, चुकीच्या मार्गाने पाऊल न टाकण्यासाठी काही गोष्टी समजून सांगणे गरजेचे आहे.आपल्या मुला-मुलींसोबत महिन्यातून किमान एकदा जवळपासच्या निसर्ग सहली, शाळा व
महाविद्यालयातील आपल्या मुला-मुलींच्या शिक्षक,
प्राध्यापकांसोबत नियमित संपर्क, अभ्यासातील प्रगतीवर कठोर लक्ष या बाबी अंमलात आणल्या तरच आई-वडील हे या पिढीचे ‘बेस्ट फ्रेण्ड’ बनतील, अन्यथा कॉफी शॉपकडे वळलेल्या या पावलांची पुढची वाटचाल त्या पिढीला कुठे नेऊन ठेवले हे सांगू शकत नाही.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular