HomeUncategorizedमंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात दिलेली माहिती साफ चुकीची महिला सरपंचाला कोणती...

मंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात दिलेली माहिती साफ चुकीची महिला सरपंचाला कोणती गाव बंदी नाही आमच्या गावची बदनामी करू नका – शेंडी ग्रामस्थांची माहिती

advertisement

अहमदनगर दि.१४ डिसेंबर
अहमदनगर शहारा जवळ असलेल्या शेंडी गावाच्या महिला सरपंचाने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन सोशल मीडियावर पोस्ट केली होती त्यावरून गावातील सर्व ग्रामस्थांनी मिळून गाव बंद ठेऊन निषेध केला होता तसेच या महिला सरपंचाच्या विरोधात गुन्हाही दाखल केला होता.

परंतु या घटनेनंतर राज्याचे अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अनेक भाषणांमधून शेंडी गावच्या महिला सरपंच ओबीसी मेळाव्याला आल्यामुळे तिला गाव बंदी केल्याचं जाहीर भाषणांमधून सांगितले होते. हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहात छगन भुजबळ यांनी पुन्हा हा मुद्दा उपस्थित करत शेंडी गावातील महिला सरपंचाला गाव बंदी केल्याचं सभागृहात सांगितले होते. मात्र ही गोष्ट साफ चुकीची असून गावाने महिला सरपंचाला गाव बंदी केली नसून त्या रोज ग्रामपंचायत कार्यालयात येऊन कामकाज पाहत आहेत. ग्रामपंचायत आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो मग त्यांना गाव बंदी केली कशावरून असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला तसेच सर्व समाज या गावात गुण्या गोविंदाने राहत आहेत मात्र आमच्या गावाची बदनामी होत असून याबाबत छगन भुजबळ यांनी खरी माहिती घेऊन वस्तुस्थिती मांडावी अशी मागणी शेंडी गावच्या ग्रामस्थांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular