Homeराज्यठरलं संभाजीराजे छत्रपती "ही"निवडणूक लढवणार पुण्यात केली घोषणा

ठरलं संभाजीराजे छत्रपती “ही”निवडणूक लढवणार पुण्यात केली घोषणा

advertisement

पुणे दि १२ मे

संभाजीराजे यांनी २००९ मध्ये राष्ट्रवादीच्या वतीने कोल्हापूरमधून लोकसभेची निवडणूक लढविली होती, पण त्यात त्यांचा पराभव झाला होता.या नंतर भाजपने त्यांना राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून नियुक्त केले होते महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आग्रह खातर संभाजी राजे यांनी खासदार म्हणून शपथ घेतली होती.


गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे नेमकी काय भूमिका घेतात याबद्दल महाराष्ट्रात उत्सुकता होती कोणत्या पक्षात जाणार हे नवीन संघटना उघडणार याबाबतची उत्सुकता त्यांच्या समर्थकांमध्ये असल्यामुळे आज त्यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काही दिवसानंतर राज्यसभेची निवडणूक होणार असून या निवडणुकीमध्ये मी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून राजकारण विरहित समाजाला दिशा देण्यासाठी समाजाला फायदा फायदा होण्यासाठी मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितला आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular