Home विशेष चायनीज मांजाने कापला गळा..नगर शहरात अजूनही चायना नायलॉन मांजा ची विक्री सुरू…दुचाकीवरून...

चायनीज मांजाने कापला गळा..नगर शहरात अजूनही चायना नायलॉन मांजा ची विक्री सुरू…दुचाकीवरून जात असताना पतंगाच्या मांजात मान अडकली; गळा चिरल्याने तरुण गंभीर जखमी

अहिल्यानगर दिनांक 8 जानेवारी

अहिल्यानगर मध्ये एका तरुणाच्या गळ्याला चायनीज नायलॉन मांजाने गंभीर दुखापत झाली असून मात्र या नशीब बलवत्तर म्हणून त्या तरुणाचा जीव वाचला आहे. सय्यद मुस्तमीर असे जखमी युवकाचे नाव असून बोल्हेगाव फाटा परिसरात ही घटना घडली आहे.

Oplus_131072

बंदी असतानाही बाजारात चायनीज मांजा बिनधास्तपणे विकला जातो, मात्र तो सामान्य मांजासारख्या धाग्याऐवजी नायलॉनपासून बनवला जातो. चायनीज मांजा याला प्लास्टिक मांजा असेही म्हणतात. चायनीज मांजा हा इतर मांजासारखा धाग्याने बनवला जात नाही. हा नायलॉन आणि धातूची पावडर मिसळून तयार केला जातो. हे प्लास्टिकसारखे वाटते आणि ताणण्यायोग्य आहे. अशा परिस्थितीत जेव्हा ते खेचले जाते तेव्हा ते तुटण्याऐवजी वाढते. तो मांजा ब्लेडसारखा धारदार असून त्याच्या विक्रीवर बंदी आहे, मात्र बंदी असतानाही त्याची खुलेआम खरेदी-विक्री सुरू आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version