अहमदनगर दि.३, जुलै
स्वस्तात घरे देतो म्हणून फसवणूक करून फरार झालेल्या ठेकेदारांविरुद्ध तक्रार देण्यासाठी अनेक वेळा सामान्य नागरिक पोलीस स्टेशनची पायरी चढत असतो मात्र आता थेट वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचीच स्वस्तात घरे देतो म्हणून फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
महाराष्ट्रातील पोलिसांना स्वस्तात घरे मिळावेत यासाठी 2009 -10 साली महाराष्ट्रातील काही पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी हा प्रकल्प राबवण्यासाठी एकत्र येत पुणे येथील लोहगाव परिसरात जवळपास 116 एकर जागा खरेदी केली होती. या जागेमध्ये वन बीएचके, टू बीएचके आणि थ्री बीएचके अशा सदनिका काढण्यात येऊन त्या पोलिसांना अल्प दरात देण्याची योजना होती.
सात लाख रुपयांपासून ते 17 लाख रुपयांपर्यंत या ठिकाणी सदनीका पोलिसांना मिळणार होत्या.पुण्यासारख्या ठिकाणी स्वस्तात घर मिळत असल्याने अनेक पोलिसांनी या ठिकाणी पैसे गुंतवले. महाराष्ट्र राज्यातील सुमारे सात हजरांच्या आसपास पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी पाच लाख रुपयांपासून ते पंधरा लाख रुपयांपर्यंत पैसे गुंतवले होते. तात्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी या मेगा सिटी प्रकल्पाला मान्यता देऊन प्रकल्प सुरू करण्यासाठी मदत केली.
सुरुवातीच्या काळात या मेगासाठी प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या पदाधिकाऱ्यांनी 116 एकर जमीन ही संस्थेच्या नावावर न घेता थेट ठेकेदाराच्या नावावर घेतली त्यानंतर ठेकेदाराने थोडेफार जुजबी काम सुरूही केले होते. मात्र 2012 पासून सदर जागेवर काही इमारती अर्धवट उभा झाल्या त्या वगळता कोणतेही काम झाले नसल्याने आपण कुठेतरी फसलो गेल्याची भावना आता पैसे गुंतवलेल्या सभासदांमध्ये झाली आहे. यासाठी आज अहमदनगर मध्ये पैसे गुंतवलेल्या सभासदांची एक बैठक पार पडली या बैठकीत आजपर्यंत सभासदांची दिशाभूल करण्यात आल्याचं समोर आले असून अनेकांनी पैसे भरूनही अक्षरशः त्यांच्या सदनिकेचा पायाही उभा झाला नसल्याचं समोर आले आहे.
हा प्रकल्प एकूण आठशे दहा करोड रुपयांचा असून सभासदांनी सुमारे साडेतीनशे कोटी जमा केले आहेत आणि प्रत्यक्ष काम हे फक्त पंधरा कोटी च्या कमी झालेले आढळून असून सभासदांची सुमारे तीनशे कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप निवृत्त पोलीस अधिकारी पोपटराव आव्हाड यांनी केला आहे.
ही संस्था जेव्हा स्थापन झाली होती तेव्हा उच्च पदस्थ पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच काही सरकारी वकील यांनीही या प्रकल्पामध्ये पैसे गुंतवले होते अहमदनगर शहरातील नामवंत वकील संजय दुशिंग यांच्या वडिलांनी या ठिकाणी सजनीका देण्यासाठी पैसे दिले होते मात्र अद्यापही त्यांना दाखवलेल्या जागी पायाही उभा राहिला नसल्याची धक्कादायक माहिती संजय दुशिंग यांनी दिले आहे अनेक सभासद सेवानिवृत्त झाले आहेत काहींचे निधनही झाले आहे तर कोरोना काळातही काही कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे मात्र अद्यापही या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना पैसे भरू नये सदनिका उपलब्ध करून दिल्या नसल्याने पुढील काळात न्यायालयीन लढा उभारणार असल्याचं एडवोकेट संजय दुशिंग यांनी सांगितले
महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी संस्थेची स्थापना झाली त्यावेळी असलेल्या संचालक मंडळाने 116 एकर पैकी फक्त 32 एकर जमीन ही सभासदांच्या सदनिकेसाठी वापरता येणार असून इतर जमीन ही ठेकेदाराला वापरण्यास देणार असल्याचे ठराव केला होता. याबाबतही मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला महाराष्ट्रातील गडचिरोली ते थेट मुंबई ,कोकण ,उत्तर महाराष्ट्र ,मध्य महाराष्ट्र या सर्व ठिकाणच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पैसे गुंतवले असल्याने आता हे प्रकरण कायद्याच्या कचाट्यात सापडणार असल्याचं दिसत आहे.
अहमदनगर शहरातील पोलीस मुख्यालयातील हॉलमध्ये आज बैठक पार पडली या बैठकीला साहेबराव कडनोर ,सुरेश भामरे, पोपटराव आव्हाड, संजय दुशिंग यांच्या सह अनेक आजी माजी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सभासदांनी उपस्थिती लावली होती पुढील काळात न्यायालयीन लढा लढण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन सर्व वक्त्यांनी बोलताना केल.
Kumpananech shet khalle asa ha prakar ahe… Sarva bhrasht Sanchalak mandalavar kaydeshir karwai zali pahije