अहिल्यानगर दिनांक १३ सप्टेंबर
मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू करून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी केली होती त्यानंतर महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शासनाने हैदराबाद गॅझेट अंमलबजावणी करण्याचे मान्य केलं आहे.

अशातच सरकारने या मागण्या मान्य केल्याने राज्यात ठिकठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देवा भाऊ म्हणून मोठ मोठे बॅनर झळकले होते.त्या नंतर वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर देवाभाऊ या जाहिरातीनंतर आता गल्लो गल्ली आणि विविध कॉलन्यांमध्ये छोटे छोटे पोस्टर झळकताना पाहायला मिळत आहे. मात्र हे पोस्टर कोणी लावले आणि कधी लावले या मध्ये मोठी गुप्तता पाळण्यात येत आहे अनेक लोकांना आपल्या घराच्या कंपाउंडवर पोस्टर लावून गेले तेही माहित नसल्याचे समोर आले आहे. मात्र आता मोठ मोठे होर्डिंग्ज,बॅनर, वृत्तपत्र,टीव्ही आणि त्यानंतर गल्लोगल्ली पोस्टर लावणारे कोण याची चर्चा मात्र जोरात सुरू आहे.
मात्र हे पोस्टर लागत असले तरी यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही अपमान होऊ शकतो रात्री अप रात्री जर हाताला लागणारे या पोस्टवर कोणी काही विचित्र प्रकार केला तर यामुळे पुन्हा समाजात दूही पसरण्यास वेळ लागणार नाही..





