अहमदनगर दिनांक नऊ ऑगस्ट
महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण या योजने पाठोपाठ आता मुख्यमंत्री वयोश्री योजना अंमलात आणली असून ही योजना तळागाळात पोहोचण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सध्या युद्ध पातळीवर काम सुरू आहे अहमदनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजना नगर शहरातील तळागाळातील 65 वर्ष व त्यावरील वयोवृद्धांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम सुरू असून अहमदनगर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी आज महानगरपालिकेत याबाबत एक बैठक घेऊन ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी आरोग्य केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या ११.२४ कोटी इतकी
आहे. त्यापैकी समस्थितीत ६५ वर्षे व त्यावरील अंदाजित एकूण १०-१२ टक्के ज्येष्ठ नागरिक (१.२५
कोटी आहेत. त्यापैकी मोठया प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा
सामना करावा लागतो. ही बाब विचारात घेवून केंद्र शासनाने दारिद्रय रेषेखालील संबंधित
दिव्यांग दुर्बलताग्रस्त नागरिकांसाठी शारिरीक अक्षमतेनुसार सहाय्य साधने उपकरणे
पुरविण्याची वयोश्री योजना सुरु केली आहे, त्यानुसार अशा ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात
आणण्यासाठी आणि गतिशीलता, संप्रेषण आणि मोकळेपणाने जीवन जगता यावे, यासाठी उपकरणे
प्रदान करण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता/दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने/उपकरणे खरेदी करता येतील. त्यामध्ये
चष्मा,श्रवणयंत्र,ट्रायपॉड, स्टिक ,व्हील चेअर,
फोल्डिंग वॉकर,कमोड खुर्ची,नि-ब्रेस, कंबर बेल्ट
सर्वाइकल कॉलर आदी वस्तू तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मन:स्वास्थ केंद्र, मनशक्ती केंद्र अथवा प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल.
या योजनेसाठी राज्य शासनातर्फे १००%. अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. थेट लाभ वितरण (D.B.T.) प्रणाली द्वारे रु.३०००/- च्या मर्यादेत निधी वितरण करण्यात येईल. अशी माहिती अहमदनगर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी दिली आहे
लाभार्थी शोधण्यासाठी विविध ठिकाणी शिबीराचे आयोजन करून त्याद्वारे लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येणार आहे तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रिनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते. अशाप्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल अशी माहिती ही डॉक्टर अनिल बोरगे यांनी दिली आहे.
तसेच निवड केलेल्या लाभार्थ्यांच्या संख्या पैकी 30 टक्के महिला राहतील या योजनेसाठी लाभार्थ्यांना आधार कार्ड अथवा मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, स्वयंघोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पाठवण्यासाठी विहित केलेली इतर कागदपत्रे आवश्यक आहेत. तरीही 65 वर्षावरील वयोवृद्धांनी या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉक्टर अनिल बोरगे यांनी केले आहे.