Homeशहरमहानगरपालिकेच्या अब्रूचे लक्तरे वेशीवर आता नागरिक सोशल मीडियावर दाखवू लागले खरी परिस्थिती...

महानगरपालिकेच्या अब्रूचे लक्तरे वेशीवर आता नागरिक सोशल मीडियावर दाखवू लागले खरी परिस्थिती प्रभाग क्रमांक सहा मधील त्या तरुणीचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच कर्मचारी पोहचला त्या ठिकाणी

advertisement

अहमदनगर दि. 2 ऑक्टोबर

आज दोन ऑक्टोबर अर्थात महात्मा गांधी जयंती ज्या प्रकारे महात्मा गांधींनी इंग्रजांना भारत छोडो आंदोलन करत सळो की पळो करून सोडले होते. त्याप्रमाणे खेड्याकडे चला आणि स्वच्छता राखा असा संदेशही महात्मा गांधींनी दिला होता मात्र या स्वच्छता राखा या त्यांच्या संदेशाला अहमदनगर महानगरपालिका पालिकेने तिलांजली दिली आहे.

अहमदनगर शहरातील रस्त्यांची परिस्थिती सध्या अत्यंत दयानीय झाली आहे. तर ज्या ठिकाणी थोडेफार रस्ते चांगले आहेत त्या ठिकाणी अहमदनगर महानगरपालिकेचे झाडू कामगार झाडू स्वच्छ करण्यासाठी येतच नाही ही वस्तुस्थिती आहे. नगरसेवकांना अनेक वेळा फोन करूनही उत्तर एकच मिळते कामगार काम संख्या कमी असल्याने आपल्या प्रभागात टप्प्याटप्प्याने झाडलोट होते तुमच्याकडे उद्या परवा येईल हे उत्तर प्रत्येक नगरसेवकाकडून प्रत्येक नागरिकाला भेटत असतं मात्र झाडू कामगारांची वाट पाहून वर्षानुवर्षे झाडू कामगार दिसत नाही तर काही ठिकाणी फक्त ठराविक बंगल्यासमोरच झाडलोट होते.

अहमदनगर शहरातील या खऱ्या वस्तुस्थितीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे एका महिलेने सोशल मीडियावर ही परिस्थिती मांडली आहे. प्रभाग क्रमांक सहा चे नगरसेवक ठराविक घरासमोरच झाड लोट करण्याचे आदेश देतात का? असा सवाल या व्हिडिओ मधून करण्यात आला आहे. तर काही लोक महानगरपालिकेच्या लोकांना पैसे देऊन आपल्या घरासमोर अंगणात झाडू मारून घेतात असा आरोपही या व्हिडिओत करण्यात आला आहे. महानगरपालिका वेळेत पगार देत नसल्याने ही परिस्थिती आली का असा सवाल आता या व्हिडिओ मधून केलेल्या प्रश्नामुळे उपस्थित झाला आहे.

अहमदनगर शहराची परिस्थिती अत्यंत दयानिय होत असून याविरुद्ध आता नागरिक हळूहळू आवाज उठवायला लागले आहेत. सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम असल्याने सोशल मीडियावर त्या तरुणीने टाकलेला व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतेय व्हिडिओमुळे महानगरपालिकेच्या नगरसेवकांना पदाधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सद्बुद्धी अशी भाबडी अशा नगरकरांना आहे.

सोशल मीडियावर वस्तुस्थिती मांडल्यानंतर काही वेळातच महानगरपालिकेचे झाडू कामगार त्या तरुणीच्या घरासमोर पोहोचले आणि त्यांनी स्वच्छता करण्यास सुरुवात केली याचा व्हिडिओ ही त्या तरुणीने सोशल मीडियावर टाकला आहे. मात्र प्रत्येक नागरिकाला आता आपली समस्या सोशल मीडियावर मांडून सोडावी लागेल का? महानगरपालिका स्वतःहून काही काम करणार नाही का? असे अनेक नाना विविध प्रश्न समोर येत आहेत. महानगरपालिकेला आरोग्य ,स्वच्छता, लाईट एवढी जबाबदारी सांभाळता येत नसेल तर काम चुकार कर्मचाऱ्यांना काढून टाकून होतकरू लोकांना कामावर घ्या आणि शहराची स्वच्छता करा नागरिक कर रुपाच्या माध्यमातून महानगरपालिकेत पैसे भरत आहेत. किमान तेवढी सेवा तरी महानगरपालिकेने नागरिकांना द्यावी अपेक्षा सामान्य नगरकर करत असतो.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular