अहिल्यानगर दिनांक 13 सप्टेंबर
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून नगर मधील बहुचर्चित खून प्रकरणातील आरोपीला जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप करत खून प्रकरणातील फिर्यादीकडील नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन हे स्टिंग ऑपरेशन केले आहे.

ओंकार भागानगरे, ओंकार घोलप यांनी 19 जून रोजी गणेश हुच्चे याच्या अवैध धंद्याची तक्रार कोतवाली पोलिसांकडे केली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. यावरून कोतवाली ठाण्याच्या आवारात हुच्चे व भागानगरे, घोलप यांच्यात वाद झाले. त्याच रात्री बालिकाश्रम रस्त्यावर टोळीने केलेल्या हल्ल्यात ओंकार भागानगरे यांचा खून झाला होता. शुभम पडोळे हा गंभीर जखमी झाला.
या प्रकरणी घोलपच्या फिर्यादीवरून गणेश हुच्चे, नंदू बोराटे व संदीप गुडा यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सर्व आरोपी सध्या नगरच्या जिल्हा कारागृहात असून जिल्हा कारागृहातून उपचाराच्या नावाखाली जिल्हा रुग्णालयात येऊन आरोपी व्हीआयपी ट्रीटमेंट घेत असल्याची माहिती फिर्यादींच्या आणि घोलप यांच्या नातेवाईकांना कळल्यानंतर दोन दिवसापूर्वी खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश हुच्चे हा जिल्हा रुग्णालयात आला होता. त्याला मिळत असलेली व्हीआयपी ट्रीटमेंट मोबाईल, आणि दारू याबाबत फिर्यादींच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी तक्रार केली असून सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद करण्यात आला आहे. ट्रीटमेंटच्या नावाखाली आरोपींना जिल्हा रुग्णालयात मिळत असलेली व्हीआयपी ट्रीटमेंट बंद करावी अशी मागणी आता भागानगरे कुटुंबीयांकडून होत असून. या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.





