Homeक्राईमअबब नगरचे अवैध धंदे झाले फेस बुक लाईव्ह त्या सामाजिक कार्यकर्त्याने थेट...

अबब नगरचे अवैध धंदे झाले फेस बुक लाईव्ह त्या सामाजिक कार्यकर्त्याने थेट क्लब मध्ये जाऊनच केलं फेसबुक लाईव्ह

advertisement

अहमदनगर दि.७ मे
अहमदनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी काही दिवसांपूर्वी नगर शहरातील अवैध धंदे बंद करा अथवा या सर्व अवैध धंदे मी फेसबुक लाईव्ह द्वारे सर्व नगरकरांना दाखवले जातील असं निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना केलं होतं.

मात्र त्यानंतरही नगर शहरातील अवैद्य धंदे सुरूच असून खुलेआमपणे मोठमोठे क्लब सुरू असल्याचं दिसून येत आहे.नगर शहरातील कायनेटिक चौक या परिसरातील एका भल्यामोठ्या क्लब मध्ये जाऊन संदीप भांबरकर यांनी फेसबूक लाईव्ह दारे थेट प्रक्षेपण करून पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

या ठिकाणी खुलेआमपणे जुगाराचा क्लब चालू असल्याचे दिसून येत आहे. हा क्लब कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे आणि पोलिसांना सांगूनही तो बंद का झालं नाही असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.यापुढे नगर शहरातील अवैध धंदे बंद केले नाही तर असेच फेसबुक लाईव्ह संपूर्ण नागरकरांना आणि पोलिसांनाही दाखवण्यात येतील असे आव्हान पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर
यांनी दिले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular