मुंबई दि.२० जुलै
अहमदनगर शहरातील माजी शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अनिल शिंदे, सचिन जाधव, माजी नगरसेवक अनिल लोखंडे, सुभाष लोंढे काका शेळके सचिन राऊत आदी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आज मुंबई येथे जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तसेच पुढील काळात एकनाथ शिंदे यांच्या विचाराने काम करण्याचा मानस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या पहिल्या भेटीतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर शहराला मोठी भेट दिली असून नगर शहरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आणि माळीवाडा वेशी जवळील महात्मा ज्योतिबा फुले तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या पुतळ्यांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून याबाबत प्रशासनाला लवकरात लवकर प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
शहरातून जात असलेल्या उड्डाण पुलामुळे माळीवाडा वेशी जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची कमी झाली आहे या उड्डाणपणामुळे वरून वाहने जाताना काही वस्तू पुतळ्यावर पडून पुतळ्याची विटंबना होऊ शकते त्यामुळे या पुतळ्यांची उंची वाढवणे गरजेचे असल्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा उभा करून यांच्या पुतळ्यांची उंची वाढवणे तसेच सुशोभीकरण करणे आणि माळीवाडा वेशीचे सुशोभीकरण करणे आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्ण कृती पुतळे उभा करणे यासाठी हा पाच कोटींचा भरीव निधी आज गेलक्या सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार दिला असल्याची माहिती माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली आहे.