अहमदनगर दि.१० ऑक्टोबर –
नगर शहर विकासासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून विकासाच्या योजनांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. शहरातील विविध रस्त्यांच्या काँक्रीकरणाची कामे सुरू झाली आहेत. नियोजनबद्ध व कायमस्वरूपीची विकास कामे व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे जमिनी अंतर्गातील विकासाची कामे मार्गी लागल्यानंतर रस्त्याची कामे हाती घेतली आहे. आता ही कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही विकासाचे एक एक प्रश्न हाती घेवून मार्गी लावत आहे. केडगाव उपनगर हे नगर शहराचे सर्वात मोठे उपनगर आहे. या भागाच्या विकासासाठी मोठा निधी प्राप्त करून दिला आहे. लिंक रोड व अर्चना हॉटेल रस्ता कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. शहरातील नागरिकांना बरोबर घेऊन सकारात्मक विचारातून शहर विकासाला गती देवू असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी यावेळी केले.
केडगाव गावठाण भागात भूषण गुंड यांच्या पाठपुराव्यामुळे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी नगरसेवक मनोज कोतकर, भूषण गुंड, मा. नगरसेवक संजय लोंढे, रमेश कोतकर, महेश गुंड, सोनू घेमुंड, सुमित लोंढे, सुरज कोतकर, नितीन गुंड, दिलावर शेख, वसीम पठाण, लखन शिंदे, आप्पा बेलदार, इस्माईल शेख, सलीम शेख, माऊली जाधव, विजय सुंबे, विकास हारेल, विजय कोतकर, बापू सातपुते, संकेत सातपुते, सागर मस्के, ऋषिकेश सातपुते, ससाने मामा, आदी उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक मनोज कोतकर म्हणाले की, केडगाव विकासासाठी आ.संग्राम जगताप यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून दिली आहे. भूषण गुंड यांच्या पाठपुराव्यामुळे केडगाव गावठाणातील रस्ता काँक्रीटीकरण्याचे काम मार्गी लागणार आहे. केडगाव देवी रस्ता मतकर वस्ती येथील पुलाचे काम आ. संग्राम जगताप यांच्यामुळे मार्गी लागले आहे लिंक रोड व अर्चना हॉटेलचे कामही लवकरच सुरू होणार असून केडगावच्या उपनगराची ओळख विकसित उपनगर म्हणून होईल असे आमदार जगताप म्हणाले
यावेळी भूषण गुंड म्हणाले की, केडगाव गावठाण वेशी जवळील कॉलनीतील रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता आ.संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा केल्याबरोबरच निधी उपलब्ध करून दिला आहे जेव्हा जेव्हा विकास कामासाठी नीधीची मागणी केली तेव्हा तेव्हा त्यांनी केडगाव विकासासाठी निधी दिला आहे.