अहिल्यानगर दिनांक 27 जुलै
अहिल्यानगर शहरात विरोधी पक्षातील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षात शहाध्यक्षपदासाठी कोणी इच्छुकच नाही का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
अहिल्यानगर शहरात विरोधी पक्षातील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षात शहाध्यक्षपदासाठी कोणी इच्छुकच नाही का? असा सवाल उपस्थित होतोय. लोकसभा निवडणुकी पर्यंत शहर अध्यक्ष म्हणून किरण काळे यांनी धुरा सांभाळली होती.किरण काळे यांच्या आक्रमक भूमिके मुळे काही काळ शहर काँग्रेसला संजीवनी मिळाली होती.मात्र लोकसभा निवडणुकी नंतर किरण काळे यांनी काँग्रेस सोडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला तेव्हा पासून काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्षपद रिकामेच आहे.

सध्या पक्षात पदाधिकारी आणि कार्यकर्ते किती शिल्लक आहेत? हे पाहण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत शहराध्यक्षपदाची जबाबदारी घेतलेल्या, किरण काळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे तेव्हा पासून शहरात एकही चेहरा शहराध्यक्षपदासाठी पक्षाकडे नाही अशी चर्चा सुरु झाली आहे.





