अहिल्यानगर दिनांक 27 जुलै
अहिल्यानगर शहरात विरोधी पक्षातील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षात शहाध्यक्षपद अनेक दिवसांपासुन रिक्त असून काँग्रेसमध्ये निवडणूक पद्धतीने शहर जिल्हाध्यक्ष पद नेमण्याची पद्धत असल्यामुळे या पदावर अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शहरात येऊन आढावा घेऊन शहर जिल्हाध्यक्ष पद नेमण्याबाबत वरिष्ठांना अहवाल दिला आहे.मात्र निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक घेऊन या पदावर नियुक्ती करण्यात येत असल्यामुळे हे पद अद्याप रिक्त असल्याचे काँग्रेसच्या शहरातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पक्षाच्या नियमात शहर जिल्हाध्यक्ष पद नेमण्या बाबत अनेक कायदेशीर प्रक्रिया असल्यामुळे ही प्रक्रिया लांबली असून किरण काळे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद अद्यापही रिक्त असल्याचं काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

शिवसेना शहर प्रमुख बदलाच्या हालचाली.
अहिल्यानगर शहरात विरोधी पक्षातील पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात शहर प्रमुखाच्या बदलाच्या हालचाली सुरू झाल्या असून सध्या या पदावर काँग्रेस मधून आलेले किरण काळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांच्यावर महिलेवर अत्याचार करण्याचा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांना या पदातून मुक्त करून दुसऱ्या शिवसैनिकाची नियुक्ती करावी अशी तोंडी मागणी शहरातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडे केली असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.
पुढील आठवड्यामध्ये अहिल्यानगर शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे एक शिष्टमंडळ शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून त्यावेळी शहर प्रमुखाच्या बाबत सविस्तर चर्चा करून शहर प्रमुख बदलावा यासाठी मागणी करणार असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.





