अहमदनगर दि. 20 जुलै
अहमदनगर शहरातील काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि विद्यमान काँग्रेसचे नेते धनंजय जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने नगर शहरामध्ये एकच चर्चेचा विषय झाला आहे.
धनंजय जाधव हे काँग्रेसमध्ये असले तरी भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे पाटील आणि त्यांची जवळीक लपून राहिलेली नाही मनपाच्या निवडणुकीनंतर काँग्रेसच्या घडामोडीत ते कुठेही दिसले नाही. मात्र भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे आणि त्यांची मैत्री आणि त्यांच्यासोबत असलेले संबंध त्यांनी कधीही लपवून ठेवलेले नव्हते.त्यामुळे अचानक कोणचाही चर्चा नसताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे. मात्र ही फक्त सदिच्छा भेट होती का एकनाथ शिंदे यांच्या गटात त्यांनी प्रवेश केला याबाबत अद्यापही कोणची माहितीआलेली नाही.
धनंजय जाधव यांच्या पत्नी सध्या काँग्रेसकडून महानगरपालिकेवर नगरसेविका म्हणून निवडून आलेले आहेत त्यामुळे धनंजय जाधव यांनी आज घेतलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट आणि नगर मधील राजकीय समीकरण पाहता पुढील काळात ते शिवसेनेत जातील अशी शक्यता नाकारता येत नाही.