Homeराजकारणकाँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या ईडी चौकशी विरोधात काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात...

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या ईडी चौकशी विरोधात काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आज नगर शहरात धरणे आंदोलन

advertisement

अहमदनगर दि.: २२ जुलै

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना ईडी चौकशीला बोलावून आपल्या हुकूमशाही वृत्तीचे दर्शन मोदी सरकारने घडविले आहे. या विरोधात काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आज नगर शहरात काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे व ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी दिली आहे.

काँग्रेसने या विरोधात सबंध देशभरामध्ये एल्गार पुकारला आहे. गुरुवारी सकाळी राज्यातील विभागीय जिल्ह्यांच्या ठिकाणी काँग्रेसच्या माजी मंत्री आणि नेत्यांच्या उपस्थितीमध्ये धरणे आंदोलने करण्यात आली आहेत. माजी मंत्री आ. बाळासाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी नाशिक येथे धरणे आंदोलन पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आज शुक्रवारी आ. थोरात यांच्या उपस्थितीमध्ये नगर शहरामध्ये धरणे आंदोलन होणार असल्याचे काळे यांनी सांगितले आहे.

शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता जुन्या बस स्थानका शेजारील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलने होणार आहेत. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ.डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे यांच्यासह अहमदनगर शहर व जिल्ह्यातील सर्व शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस पदाधिकारी, सर्व फ्रंटल, आघाड्या, सेल यांचे प्रमुख, त्यांचे पदाधिकारी, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती साळुंखे यांनी दिली आहे.

केंद्रातील मोदी सरकार विरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहिला मिळत आहे. त्यातच अहमदनगर जिल्ह्यामध्ये माजी मंत्री आ.थोरात यांच्या नेतृत्वाखाली संघटना रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळत असून या माध्यमातून काँग्रेसने सरकारच्या विरोधात कंबर कसल्याचे दिसत आहे. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर आ.थोरात पहिल्यांदाच नगर शहरामध्ये धरणे आंदोलनाच्या निमित्ताने येणार आहेत त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular