अहिल्यानगर दिनांक 21 जानेवारी
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीतील नगरसेवकांची नावे मंगळवारी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्या नंतर आता पुढच्या तयारीला भाजप आणि राष्ट्रवादी युती लागली असून आज नाशिक येथे गटनोंदणी करण्यासाठी युतीचे नगरसेवक रवाना झाले आहेत.
भाजप आणि राष्ट्रवादी नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली असून दोन्ही पक्षांचे 52 नगरसेवक एकत्रितपणे गटनोंदणीसाठी नाशिकला विभागीय आयुक्तांकडे रवाना झाले आहेत.
शिवसेनेमध्ये सुद्धा गटनोंदणीच्या हालचाली सुरू झाल्या असून आज किंवा उद्या शिवसेनेचे नगरसेवक नाशिकला रवाना होणार आहेत. मात्र गटनेते कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून गटनेत्या बाबत सर्वच पक्षांनी अद्याप तरी अत्यंत गोपनीयता पाळली आहे. सर्वच पक्ष विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी करून तसेच पत्र महापालिका आयुक्तांकडे सादर करतील.





