Homeराजकारणनगरसेवक योगीराज गाडे यांच्या प्रवेशावरून राजकारण तापले स्मिता अष्टेकर यांनी केली जिल्हाध्यक्षांच्या...

नगरसेवक योगीराज गाडे यांच्या प्रवेशावरून राजकारण तापले स्मिता अष्टेकर यांनी केली जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी

advertisement

अहमदनगर दि.२१ जुलै
अहमदनगर शहरातील शिवसेनेचे आजी माजी नगरसेवक तसेच काही पदाधिकारी पदाधिकाऱ्यांनी मुंबईत जाऊन बुधवरी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता नगर शहरात या प्रवेशावरून चांगलंच वातावरण तापले असून जे नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत त्यांचे निलंबिन करावे तसेच या प्रवेशाच्या वेळी अहमदनगर दक्षिण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांचे सुपुत्र नगरसेवक योगीराज गाडे यांचाही प्रवेश झाला असे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ट्विटर हँडलवर करण्यात आले त्यामुळे शशिकांत गाडे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आज काही नगरसेवकांसह स्मिता अष्टेकर यांनी गाडे यांच्याकडे केली आहे.

तर एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला नसल्याचं योगीराज गाडे यांनी स्मिता अष्टेकर यांना सांगितलं असल्याचं समजतंय त्यामुळे योगीराज गाडे  हे आपल्या एका खाजगी कामा निमित्त मुंबईला गेले होते ज्या ठिकाणी सत्कार आणि प्रवेश सोहळा झाला त्या ठिकाणी युवराज गाडी उपस्थित नव्हते मात्र जेव्हा नगर शहरातील पुतळ्यासंदर्भात बैठक होती त्या ठिकाणी युवराज गाडे उपस्थित होते त्यामुळे योगीराज गाडे आणि प्रवेशाचा काही संबंध नसल्याचा खुलासा योगीराज गाडे  यांनी स्मिता अष्टेकर यांच्याकडे केला असल्याचे समजतंय. त्यामुळे गाडे यांचा एकनाथ शिंदे गटात प्रवेश झाला का नाही यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे याबाबत ज्या गटाने एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला त्या गटाकडूनही मौन बाळगले जात आहे त्यामुळे गाडे यांच्या प्रवेशावरून चांगलंच राजकारण तापले आहे.

याबाबत आता योगीराज गाडे  पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत असून एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये यापुढे असेच धुमचक्री चालू राहणार असल्याचा दिसतंय.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular