अहमदनगर दि.१६ ऑगस्ट
स्वातंत्र्यदिनी भुईकाेट किल्ल्यावर भारत विराेधी घाेषणाबाजी करणाऱ्या युवकांना न्यायालयासमाेर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या युवा पदाधिकाऱ्याने चाेप दिला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे न्यायालयात एकच गाेंधळ उडाला हाेता. न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेच्या शिंदे गटाचा युवा संघटक अमाेल हुंबे याला भिंगार कॅम्प पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भुईकाेट किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनी सैयद तौकीर आरीफ तौकीर, परवेज इजाज पटेल मकसुद वसिम शेख , साद साजीद तांबोळी आणि अरबाज उर्फ बंबई शेख या पाच जणांनी भारताविराेधात घाेषणाबाजी केली हाेती. याप्रकरणी भिंगार कॅम्प पाेलिस ठाण्यात गुन्ह्याची नाेंद झाली आहे. आर्म्ड बेसिक ट्रेनिंग रेजिमेंटमधील हवालदार प्रशांत कुमार श्री चंदेश्वरसिंग यांनी फिर्याद दिली होती.
आरोपींना भिंगार कॅम्प पोलिसांनी दुपारच्या सुमारास न्यायालयात आल्यानंतर शिवसेनेच्या युवा संघटक अमाेल हुंबे यांनी न्यायालयातच चोप दिल्याने एकच खळबळ उडाली होती पोलिसांनी हुंबे यांना ताब्यात घेऊन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये नेले आहे तर शिवसेनेच्या शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून आहेत.
शिवसेनेचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांनी सांगितले आहे की देशद्रोही आणि देश विरोधी काम करणाऱ्या लोकांना शिवसेना स्टाईलने यापुढे उत्तर दिले जाईल महापुरुषांच्या अवमान करणाऱ्या लोकांनाही यापुढे याच पद्धतीने उत्तर दिले जाईल असा विचार आहे निलेश सातपुते यांनी दिला आहे.