अहमदनगर दि.७ मार्च
कायद्याचा धाक संपत चाललाय का ? हा प्रश्न आता जुना झालाय तर कायद्याचा धाक संपलाच आहे असेच म्हणावे लागेल. कारण सध्या अनेक घटनांवरून कायद्याचा धाका बाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. याआधी पोलिसांना मारहाण करण्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत पुढे त्या आरोपींचे काय होते ही गोष्ट आपल्याला माहिती नाही मात्र आता चक्क कोर्टामध्येच शिवीगाळ करून न्यायालयाचा अवमान करण्याची हिम्मत आरोपींमध्ये आली आहे आणि हे होत असताना सर्वांनीच बघ्याची भूमिका घेतल्यामुळे आरोपींवरील कायद्याचा धाक संपला आहे का ? असा प्रश्न निर्माण होतोय.
अहमदनगर जिल्हा न्यायालयात आज एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक करून आणले होते. मात्र या सराईत गुन्हेगाराने न्यायालयात अरेरावी आणि न्यायालयाच्या आवारात शिवीगाळ करत प्रचंड गोंधळ घातला यामुळे कायदा नेमका कोणासाठी आहे हा प्रश्न निर्माण होतो. त्या गुन्हेगाराने अर्वाचे भाषेत बोलत न्यायालयात आणि न्यायालयाच्या बाहेर बराच मोठा गोंधळ घातला हा गोंधळ सुरू असताना त्याने कोणालाच जुमानले नाही हेही विशेष. त्यामुळे गुन्हेगारांवरील कायद्याचा धाक कमी होत चालला आहे असेच म्हणावे लागेल आणि ही गोष्ट निश्चितच समाजासाठी अत्यंत घातक आहे.सध्याच्या काळात सर्वात जास्त विश्वास माणूस न्यायालयावर ठेवतो तिथून न्याय मिळेल ही अपेक्षा प्रत्येक माणसाला आहे. आणि न्यायालय सुद्धा त्याचप्रमाणे काम करत आहे. मात्र न्यायालयाच्या आवारातच असे काही प्रकार घडत असतील तर कायद्याचा धाक संपला असेच म्हणावे लागेल मात्र जर अशा गोष्टी वारंवार घडत असतील तर या गोष्टी समाजासाठी घातक तर आहेच मात्र न्यायालय आणि पोलीस प्रशासन यांनाही घातक ठरू शकतात त्यामुळे अशा गुन्हेगारांवर वेळीच कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
मध्यंतरी अहमदनगर जिल्ह्यात राहुरी येथील वकील दाम्पत्याचे खून प्रकरण त्यामागील आरोपी याची कहाणी मोठी रंजक होती आणि त्या घटनेवरून कायद्याचा किती धाक गुन्हेगारांवर आहे हेही लक्षात आले आहे. त्यावेळी अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील वकील बंधूंनी या घटनेचा निषेध केला तसेच खोटे गुन्हे दाखल करण्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढत आहे याबाबत वकील बांधवांनी वकील संरक्षण कायदा मंजूर करावा यासाठी उपोषण आणि मोर्चेही काढले होते. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा वेळ निघून गेल्यावर पश्चातापाशिवाय काहीच हाती राहत नाही.