अहमदनगर दि.२७ सप्टेंबर –
बनावट सोने तारण प्रकरणात शहर सहकारी बॅंके नंतर आता श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को अर्बन क्रेडिट सोसायटीच्या (Shree Sant Nagebaba Multistate Co Urban Credit Society) खात्यातून बनावट सोने मिळण्याचे सत्र काही थांबताना दिसत नसून पोलिसांनी मंगळवारी केलेल्या तपासात 32 खात्यात दोन किलो 10 ग्रॅम बनावट सोने मिळून आले आहे.
सचिन लहानबा जाधव ( निमगाव वाघा) याने आपल्या काही साथीदारांसह विविध गरजू लोकांच्या नावे हे सोने तारण ठेवले आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढत असून पोलीस आजही काही खात्यांची तपासणी करणार आहेत बनावट सोने तारण प्रकरण हे या दोन बँकेवरच थांबणार नसून भिंगार येथील महात्मा फुले पतसंस्थेची सोने तारण केलेली पावती या आरोपीकडे आढळून आली होती. त्या संस्थेच्या संशयीत खाते तापसल्या नंतर अजून काही बनावट सोने तारण कर्ज खाते समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
या प्रकरणाचा तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक गजेंद्र इंगळे , पोना.बापुसाहेब गोरे, पोकॉ गणेश ढोबळे, पोहेकॉ दिपक बोरुडे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोना सलिम शेख, बंडू भागवत, पोकॉ सुमित गवळी, करत आहेत