मुंबई दि.२६ एप्रिल
मी मागासवर्गीय असल्याने मला पोलिसांनी प्यायला पाणी दिलं नाही. मला शौचालयातही जाऊ दिलं नाही, असा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्रं लिहून याबाबतची तक्रारही केली होती.
पहा व्हिडीओ
त्याची लोकसभा अध्यक्षांनी गंभीर दखल घेऊन सरकारकडून अहवाल मागितला होता. मात्र, पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नवनीत राणा आणि रवी राणा पोलीस ठाण्यात कॉफी घेत असल्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे.
त्यामुळे नवनीत राणा या खोटं बोलत असून जातीचा आधार घेत असल्याचं स्पष्ट होत आहे. शिवाय अजून काही सांगायलाच हवं का? असं बोलकं कॅप्शन देऊन पांडे यांनी राणा यांच्या जातीय आरोपांना प्रत्युत्तरच दिलं आहे.