HomeUncategorizedएमआयडीसी परिसरात विनापरवाना फटाके वाहतुक करणाऱ्या इसमावर एमआयडीसी पोलिसांची कारवाई बत्तीस...

एमआयडीसी परिसरात विनापरवाना फटाके वाहतुक करणाऱ्या इसमावर एमआयडीसी पोलिसांची कारवाई बत्तीस लाख रुपयांचा मुददेमाल जप्त.

advertisement

अहिल्यानगर दिनांक २१ जून

शनिवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की निंबळक बायपास रोडवरील लामखेडे पेट्रोल पंपाजवळ गाडी क्रमांक टी एन २९ सी यु १२६६ मध्ये एक इसम सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना ज्वलनशिल पदार्थ सुरक्षित राहील याबाबत योग्य ती दक्षता न घेता वाहतुक करीत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन सदर ठिकाणी जावुन खात्री करता सदर ठिकाणी बातमीतील नमुद वर्णनाचा कंटनेर व टाटा एस कंपनीचा टेम्पो क्रं एम एच १६ सी.डी ५७९२ उभे होते व कंटेनरमधील माल हा टाटा एस कंपनीच्या गाडीत उतरवीत असल्याचे दिसुन आले तेव्हा आम्ही सदर कंटेनरजवळ जावुन खात्री करता कंटेनरचे केबीन मध्ये एक इसम बसलेला दिसला त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुरेशकुमार वेलस्वामी वय ३५ वर्ष रा. ९ इस्टस्ट्रीट ओव्हीयमपलायम ता. पारामती वेल्लुर जि. नामक्कल तामिळनाडु असे असल्याचे सांगुन तो कंटेनरचा ड्रायव्हर असल्याचे सांगितले त्यास त्याचे ताब्यातील कंटेनरमध्ये काय माल आहे याबाबत विचारपुस करता त्याने अर्धवट माहिती सांगुन उडवाउडवीची उत्तरे दिली त्याचा आम्हास संशय आल्याने आम्ही त्यास कंटेनर मधील माल दाखविण्याबाबत सांगितले असता त्याने कंटेनरचा दरवाजा उघडला असता कंटेनरमध्ये स्फोटक पदार्थ फटाक्याचे बॉक्स असल्याचे दिसले चालक इसम नामे सुरेशकुमार वेलस्वामी यांस कंटनेरमधील मालाचे कागदपत्रांबाबत व सदरचा माल कोठुन भरला व कोठ नेत आहे याबाबत विचारपुस केली असता त्याचेकडे कोणताही परवाना नसले बाबत सांगितले.

सदर आरोपी यांचेकडुन १) एक टाटा कंपनीचा कंटेनर त्याचा रजि. नं. टी एन २९ सी यु १२६६ २) एक टाटा एस कंपनीचा टेम्पो त्याचा रजि. नं. एम एच १६ सीडी ५७९२ असा असलेला व स्फोटक पदार्थ फटाके असा एकुण ३२,०६,३४३ रुपये चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे निंबळक बायपास रोडवरील लामखेडे पेट्रोल पंपाजवळ १) इसम नामे सुरेशकुमार वेलस्वामी वय ३५ वर्ष रा. ९ इस्ट स्ट्रीट ओव्हीयमपलायन ता. पारामती वेल्लुर जि. नामक्कल तामिळनाडु २) किरण संजय खामकर रा.इसळक ता.जि. अहिल्यानगर ३) मालाचे ग्राहक, पुरवठादार यांनी विनापरवाना बेकायदेशीर पणे फटाके तसेच स्फोटक पदार्थ जवळ बाळगुन तसेच वाहतुक करतांना व सार्वजनिक ठिकाणी लोकांचे जिवीतास पोहचणा-या संभाव्य धोक्यापासुन सुरक्षित राहणेबाबत कोणतेही काळजी न घेता तसेच इतरांची व व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात आणण्याची कृती करतांना मिळुन आले म्हणुन त्याचेविरुद्ध एमआयडीसी पोस्टेला गुरनं ४७८/२०२५ BNS कलम २८८,१२५ A,B, ३(५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलम ३३ (H)/१३१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई मा.श्री सोमनाथ घार्गे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा श्री. प्रशांत खैरे साहेब अपर पोलीस अधीक्षक सो. अहिल्यानगर श्री. अमोल भारती साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी सो.नगर ग्रामीण विभाग अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि माणिक चौधरी प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोसई विनोद परदेशी, पोसई मनोज मोंढे, सफौ खेडकर, पोहेकॉ पितळे, पोहेकॉ आडबल, पोहेकॉ सुद्रीक, पोकों/किशोर जाधव, पोकॉ/नवनाथ दहिफळे, मोबाईल सेलचे राहुल गुंडु यांचे पथकाने केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular