HomeUncategorizedअहमदनगर केमिस्ट असोशियनच्या वतीने नगर शहरात सीसीएल क्रिकेट सामन्यांचे आयोजन

अहमदनगर केमिस्ट असोशियनच्या वतीने नगर शहरात सीसीएल क्रिकेट सामन्यांचे आयोजन

advertisement

अहमदनगर दि.११ मे

अहमदनगर केमिस्ट असोशियनच्या वतीने नगर शहरात ९ ते १५ मे पर्यंत केमिस्ट चॅम्पियनशिप लीग २०२२ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. केमिस्ट परिवाराचे अशोक रेणूगोंटला यांच्या स्मरणार्थ या लीगचे आयोजन करण्यात आले असून या लीगचा शुभारंभ आ.अरुण जगताप,आ. संग्राम जगताप यांच्या उपस्थित पार पडला तर यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया,सिद्धी ग्रुप स्काय ब्रीजचे संचालक मनोज छाजेड, मुकेश छाजेड श्रीदीप हॉस्पिटलचे संचालक डॉ.अमित बडवे व संचालक मंडळाची उपस्थिती होती.पोलीस बँड पथकाच्या धून वाजवून मशाल पेटवून आगळ्या वेगळ्या पद्धतीने या सीसीएल लीगचा शुभारंभ करण्यात आला.

मेडिकल क्षेत्रात काम करणाऱ्यांना एकत्र येण्यासाठी कमिटीतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेमध्ये डॉक्टर्स,केमिस्ट व एम. आर.यांचे संघ सहभागी झाले आहेत.वडियापार्क मैदानात रात्री क्रिकेट सामने रंगत असून नगर मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय सामन्यात वापरण्यात येणारे स्टंप (यष्टी) या सामन्यादरम्यान वापरण्यात येत आहे त्यामुळे स्टंप (यष्टी)ला बॉल लागला की स्टंप मधून लाईट लागते त्यामुळे खेळाडू बाद आहे का नाही हे रात्रीच्या वेळेसही चांगल्या प्रकारे दिसते तर घर बसल्या नागरीक या सामन्यांचा आनंद घेऊ शकतात त्यासाठी असोसिएशनने युट्युब वर थेट प्रेक्षपणाची सोय केली आहे. तर वडियापार्क मैदानावर नगरकर या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी गर्दी करत आहेत.

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी केमिस्ट असोशियनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर, विशाल शेटीया, मनीष सोमानी, संदीप कोकाटे, रुपेश भंडारी, प्रशांत पाटील, मनोज खेडकर, ओम गुंडू, अभिजीत जाधव, अभिजीत गांगडे,राहुल जाधव, रीनुल गवळी, सौरभ झालानी, तुषार काळे, कमलेश गुंदेचा, वैभव वाघ, श्रीनिवास बोडखे, अमित गोयल, किरण रासकर,अविनाश काळे, भूपेंद्र खेडकर आदी केमिस्ट बांधव परिश्रम घेत आहेत.

आज पर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये मोठी चुरस पाहायला
मिळली असून सुरवातीला झालेल्या सामन्यात सिद्धिविनायक चॅलेंजर विरुद्ध सुपेकर सुपर किंग मॅच होती आणि सुपेकर सुपर किंग्स सहा विकेट्सनी सामना जिंकला दुसऱ्या सामन्यात पुष्पा इलेव्हन सुपर किंग विरुद्ध टीम शारदा यांच्यामध्ये सामना रंगला मात्र टीम शारदा संघाने नऊ विकेट एकतर्फी सामना जिंकला तर रॉयल सुपर इंडियन्स विरुद्ध ओम शिवाजीयन्स यांच्यामध्ये सामना झाला यात ओम शिवाजीयन्सने आठ विकेट्सने मॅच जिंकली तर कुंदन इलेव्हन आणि नमोह 99 यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात कुंदन इलेव्हन ने 28 रणांनी सामना जिंकला असून अनेक चांगले सामने या ठिकाणी पाहायला मिळत असून नगरकरांना खेळाची एक मेजवानी याठिकाणी भेटत असल्याने नगरकरांनी या सामन्याचा आनंद घ्यावा असे आवाहनही केमिस्ट असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular