अहिल्यानगर : आर्किटेक्टस् इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असो अहिल्यानगरची या वर्षी आय पी एल च्या धर्तीवर एकूण २० टीमच्या खेळाडू निवडीसाठी एसा बॉक्स क्रिकेट सिजन ३ ची नुकतीच लिलाव प्रक्रिया आर पडली. यामध्ये प्लॅटिनम प्रायोजक असलेल्या एस आर जे स्टील, गोल्डन प्रायोजक राघवेंद्र सप्लायर्स प्रा. लि आणि श्री वेंकटेश्वरा आर एम सी अँड सप्ल्यायर्स तसेच सिल्वर प्रायोजक असलेल्या श्री आनंद ट्रेडिंग कंपनी, पटेल सिरॅमिक्स, पंकज स्टील ट्रेडर्स, एरिक्सा किचन ॲप्ल्याअन्सेस, डायकिन ए सी सोल्युशन्स पाइप लाइन रोड, इकोप्लास्ट कन्स्ट्रक्शन ॲडेसिव्ह, अल्केन ए ए सी ब्लॉक्स, वैष्णवी टाईल्स अँड ट्रेडिंग कंपनी, ए टू झेड कन्स्ट्रकशन, वैष्णवी मार्बल्स, अर्टिको लिफ्ट, मॉडर्न आर सी सी अँड लाइम वर्क्स, सम्राट इलेक्ट्रिकल, श्री आनंद सेल्स, आबेदिन पेंट्स सावेडी, गिरिजा आर एम सी -अण्णा ग्रूप, एसा टीम यांच्या ओनर अथवा प्रतिनिधी यांनी सहभाग नोंदवला.

या २० टीम साठी प्रितेश कांकरिया, संकेत पादीर, प्रथमेश सोनावणे, प्रिन्स फुलसौंदर, सागर ढगे, ओमकार म्हसे, उदित हिरे, सलिम शेख, ओजस नवले, आदिनाथ आंबेकर, गौरव मांडगे, अविनाश देवी, अन्वर शेख, आदिनाथ दहिफळे, प्रितम मुथा, प्रमोद भाळवणकर, शैलेश सप्रे, अजय दगडे, अभिजित शिंदे यांनी टीम कॅप्टन नात्याने लिलावात खेळाडू साठी टीम मालकासह बोली लावली. जितेश सचदेव, शुभम आठरे यांना सर्वाधिक तेरा लाख तर सुजित काकडे, मयूर देशपांडे, आशिष कापसे, मानव निमसे यांना दहा लाखापेक्षा जास्त आभासी रक्कमेवर बोली भाव मिळाला.
यावेळी प्रत्येक टीमला आभाशी रू. २१ लाखाची रक्कम देण्यात आली टीम प्लेअर त्यांच्या खेळाप्रमाणे अ, ब आणि क अशी वर्गवारी करण्यात आली. प्रत्येक टीम साठी अ मधील दोन, ब मधील दोन आणि क मधील दोन खेळाडू साठी लिलाव करण्यात आला. तसेच सभासदांच्या मुलांनाही संधी देऊन त्यातील एकाची आणि टीम ओनरचे एक अथवा दोन खेळाडू घेण्याची मुभा देण्यात आली. अ साठी रू. ३ लाख, ब साठी बेसिक रू. २ लाख आणि क साठी बेसिक १ लाख मूल्य ठरवून त्यावर लिलावात बोली लावण्याचे ठरले. स्पोर्टस कमिटी हेड जितेश सचदेव यांनी या प्रकारे प्रथमच संस्थेत लिलाव पद्धतीने सर्वाधिक वीस संघ घेऊन सभासदांसाठी बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले.
या प्रक्रियेत संचालक भूषण पांडव, प्रदिप तांदळे, सुनिल औटी, संतोष खांडेकर, संजय चांडवले, अनमोल जैन, सचिन डागा, गौरव मांडगे, सुनिल जाधव आणि स्पोर्ट्स कमिटी सदस्य झोहेब खान, अमेय कुलकर्णी, रोशन गुगळे आणि आकिब काझी यांनी सहभाग नोंदवला. हा आय पी एल च्या धर्तीवरील उत्कंठा वाढविणारी लिलावाची प्रक्रिया सी ए सनित मुथा आणि मनीष दुग्गड यांनी योग्य पद्धतीने हाताळली.
संस्था अध्यक्ष अभिजीत देवी यांनी बॉक्स क्रिकेट सारख्या स्पर्धेच्या माध्यमातून सभासदांमधील खिलाडू वृत्ती जोपासली जाऊन एकमेकांमध्ये कौटुंबिक जिव्हाळा जोपासला जातो. यामुळे संघटना आणखी एकजीव होऊन त्यात आणखी बळकटी येते. सभासदांना शरीर आणि मन सदृढ ठेवण्याचा महत्वाचा संदेश अहिल्या नगरकरांना देण्याची संधी मिळते. मागील दोन वर्षांपासून बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन प्रायोजकत्व माध्यमातून मिळत असून यामुळे सभासद तसेच मटेरियल वितरित करणाऱ्या कंपनी, वितरक, दुकानदार हेही यात खेळाडू म्हणून खेळणार असून यामुळे कंपनी प्रतिनिधी, सप्ल्यायर आणि सभासद यांच्यातील संबंध दृढ होण्यास मदत होणार आहे. असे सांगितले.




