अहिल्यानगर दिनांक ७ डिसेंबर
अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व आंजनेय प्रतिष्ठान आयोजित ‘बाळासाहेब पवार स्मृती करंडक’ जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

यावेळी आंजनेय प्रतिष्ठानच्या वतीने स्वर्गीय माजी आमदार अरुणकाका जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. काकांचे आणि क्रिकेटचे जुने नाते होते, त्यांनी नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
क्रिकेटचे धडे गिरवण्याचे आणि उत्तम खेळाडू घडविण्याचे काम या स्पर्धेच्या माध्यमातून होत असते. याच स्पर्धेतून किरण चोरमले आणि अनुराग कवडे यांनी आपल्या खेळाच्या माध्यमातून भारतीय संघात स्थान मिळवले, ही आपल्या जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. कै. बाळासाहेब पवार यांचा वारसा कपिल पवार समर्थपणे चालवत असून १२, १४, १६ व १९ वर्षाखालील मुलांसाठी हक्काचे व्यासपीठ त्यांनी निर्माण करून दिले आहे.
वाकोडी येथील साईदीप मैदानावर चालणाऱ्या या स्पर्धेत गुलाबी बॉलवर (Pink Ball) १२, १४, १६ वर्षाखालील मुलांचा क्रिकेटचा थरार रंगणार असून जिल्ह्यातील २७ संघ आणि ४०० पेक्षा जास्त खेळाडू यात सहभागी होत आहेत.
या उद्घाटन प्रसंगी रणजीपटू अनुपम संकलेचा, शहर बँकेचे उपाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, डॉक्टर हर्षवर्धन तनवर, सुमतीलाल कोठारी, डॉक्टर अमित सपकाळ, अंबारिश पाटील, अमोल घोलप, लक्ष्मीकांत दिवाणी, गणेश गोंडाळ, आयोजक कपिल पवार, कमलेश भंडारी, गौरव पितळे, संदीप घोडके, डॉक्टर राहुल पवार, संभाजी पवार, दिलीप पवार, अरुण नाणेकर, निखिल पवार, क्रीडा अधिकारी आकाश थोरात, सुजय दरेकर, शरद पाटील, विलास साळुंखे, भरत पवार, अतुल जैन, पंकज कुताळ, संदीप आडोळे, राजेंद्र निंबाळकर, ज्ञानेश चव्हाण, सोमनाथ नजान, उमेश ठाणगे यांच्यासह अनेक खेळाडू आणि क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.





