नगर : दिनांक ९ डिसेंबर
एसाने अहिल्यानगर मधील बांधकाम क्षेत्रातील सोळा डीलर्स, व्यावसायिक यांना प्रायोजकत्वसाठी एकत्र घेऊन एस आर जे यांच्या संयुक्त विद्यमाने बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, एम सी ए चे माजी सदस्य जयंत येलुलकर आणि एस आर जे स्टीलचे एरिया मॅनेजर अविनाश पुरोहित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेत १६ प्रायोजक कंपनीने त्याचे संस्थेचे सभासद असलेले खेळाडू घेऊन त्यांच्या टीम उतरवल्या होत्या. साखळी सामन्यासह एकूण ३१ चुरसीचे सामने यात घेण्यात आले. या स्पर्धेत अहिल्या नगर मधील नामांकित असलेले बांधकाम मटेरियल सप्लायर्स श्री आनंद सेल्स, वैष्णवी टाईल्स अँड मार्बल्स, श्री वेंकटेश्वरा आर एम सी, श्री राघवेंद्र सप्लायर्स, पंकज स्टीलस्, पटेल सिरॅमिक, सुमतीलाल अँड सन्स, मॉडर्न आर सी सी अँड लाइम वर्क्स, ससे ट्रेडिंग कंपनी, श्री आनंद ट्रेडिंग कंपनी, ए टू झेड कन्स्ट्रक्शन, वेंकटेश इंफ्रा, अबेदिन पेंटस, आकाश सप्लायर्स, सम्राट इलेक्ट्रिकल्स यांनी आपल्या खेळाडूंसह सक्रिय सहभाग घेतला.
प्रत्येक सामन्यातील सामन्याचा मानकरी पुढीलप्रमाणे दर्शन पोखरणा, किरण चौधरी, वैभव निमसे, रौनक भंडारी, आकाश ससे, प्रथमेश सोनवणे, आकाश भुजबळ, जयप्रकाश विधाते, अमेय कुलकर्णी, प्रिन्स फुलसौंदर, किरण चौधरी, आकाश ससे, वैभव निमसे, श्रीकांत चीलकरवार, झोहेब खान, प्रिन्स फुलसौंदर, दर्शन पोखरना, शुभम आठरे, उदित हिरे, यश गुगळे, शुभम देशमुख, ओंकार म्हसे, किरण चौधरी, जितेश सचदेव, अभी कोके, अनिकेत हळगावकर, परेश व्यवहारे, आकाश ससे, प्रविण शिंदे, अभी कोके आहेत. पूर्ण सिरीज मधील बेस्ट बॅटमॅन अभी कोके, बेस्ट बॉलर दर्शन पोखरणा, बेस्ट फिल्डर प्रिन्स फूलसौंदर, मेन ऑफ द सिरीज किरण चौधरी ठरले. वेंकटेश इंफ्राचे ओम आठरे ओनर आणि सलीम शेख कॅप्टन असलेली टीम विजेती ठरली तर सुमातीलाल अँड सन्स यांचे प्रफुल्ल चोरडिया ओनर असलेली आणि अनिकेत हळगावकर कॅप्टन असलेली टीम उपविजेती जाहीर करण्यात आली. अंतिम सामन्यात किरण चौधरी हे सामन्याचे मानकरी जाहीर करण्यात आले. पूर्ण स्पर्धेचे अंपायर काम चैतन्य खोलगडे आणि त्यांच्या टीमने केले. या सर्व स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन स्पोर्ट्स कमिटी अध्यक्ष जितेश सचदेव, खजिनदार भूषण पांडव आणि सचिव अभिजित देवी यांनी पाहिले.
संस्था अध्यक्ष आदिनाथ दहिफळे यांनी या अतिशय भव्य स्वरूपात आणि सर्व सामान्यांसह आठ दिवस चाललेल्या उपक्रमात सहभागी संस्था सभासद, सप्लायर्स आणि प्रायोजक यांचे स्वागत करून आभार मानले. सचिनभाऊ जगताप यांनी अंतिम सामन्याचा टॉस करून संस्था राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
जयंत येलुलकर यांनी एसा सभासद अश्या उपक्रमाच्या माध्यमातून आपला कामाचा ताणतणाव कमी करण्यासह खेळ भावना जागृत करणे,आपसातील हितसंबंध दृढ करणे तसेच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती वाढविण्यास पूरक वातावरण निर्मिती करत असल्याचे नमूद केले.
सर्वांचे आभार मानताना जितेश सचदेव यांनी हा उपक्रम एसा भवन बांधकाम मदत निधी साठी घेतला असल्याचे नमूद करून सर्वांच्या सहकार्य आणि सहभागाबद्दल संस्था सभासद आणि प्रायोजक सप्लायर्स यांचे आभार मानले.
एसा भवन कमिटी अध्यक्ष इक्बाल सय्यद यांनी स्पोर्ट्स कमिटीने केलेली ही मौलिक मदत सर्वांच्या स्मरणात राहणार असल्याचे सांगून स्पर्धेत २० वर्षा पासून ७५ वर्ष असलेल्या सभासदांनी सहभाग घेतल्याचे सांगितले. तसेच एसा भवन बांधकाम निधी संकलित करण्यास घेतलेल्या पुढाकाराबद्दल एसा संचालक मंडळ आणि स्पोर्ट्स कमिटीचे आभार मानले.
या कार्यक्रमास उपाध्यक्ष विनोद काकडे, नंदकिशोर घोडके, संतोष खांडेकर, सचिन डागा, यश शहा, मयुरेश देशमुख, अन्वर शेख, संकेत पादिर, विकार काझी, शैलेश सप्रे, गौरव मांडगे, पंकज जहागिरदार, विजय पादिर, संजय पवार, संजय चांडवले, एस यू खान, सुनिल औटी, उदय तरवडे यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप तांदळे यांनी केले तर जितेश सचदेव यांनी उपस्थितांचे आभार मानले.