Homeक्राईमकर चुकवून आणलेली ८.४३,४५,०००/- रुपये किमतीची गुटखा बनविण्यासाठी लागणारी सुपारी व तंबाखु...

कर चुकवून आणलेली ८.४३,४५,०००/- रुपये किमतीची गुटखा बनविण्यासाठी लागणारी सुपारी व तंबाखु राहुरी परिसरातून जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

advertisement

अहिल्यानगर दिनांक २८ ऑगस्ट

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक, किरणकुमार कवाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध धंधाची माहिती काढून अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करणेबाबत आदेश दिलेले आहेत. नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रमेश गांगडे, गणेश लबडे, राहुल द्वारके, लक्ष्मण खोकले, भिमराज खसे, रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, सतिष भवर, सुनिल मालणकर, महादेव भांड, उमाकांत गावडे यांचे पथक तयार करून सदर पथकास अवैध धंद्याची माहिती काढून अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना करण्यात आलेले होते. दिनांक २७/०८/२०२५ रोजी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार असे राहुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना, किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना गुप्त बातमीदाराचे मार्फतीने बातमी मिळाली की, गुटखा बनविण्यासाठी लागणारी सडलेली लाल रंगाची सुपारी, तंबाखू असे अवैध रित्या कर्नाटक या ठिकाणी आणून तेथुन गुजरात राज्यामध्ये गुटखा बर्नावण्यासाठी शासनाचा कर चुकवून व बनावट बिले तयार करुन जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकास बातमीची माहिती देवून सापळा रचुन कारवाई करणेबाबत सुचना देण्यात आल्या. पथकाने बातमीतील हकीगतीप्रमाणे चिंचोलो, चिंचोली, ता. राहुरी गांवचे शिवारात हॉटेल महालक्ष्मी, चौधरी पॅलेस येथे सापळा रचून खालीलप्रमाणे वाहने व ट्रक चालक ताब्यात घेण्यात आले.

Oplus_131072

अबरार अल्लाउद्दीन खान (वय ३० वर्षे, रा. साखरस, ता. फिरोजपुर, जिल्हा नुह, हरियाण) तोफिक हनिफ खान (वय ३० वर्षे, ररा. बिरसिका, ता. जि. नुह, हरियाणा) अक्रम इसब खान (वय २८ वर्षे, रा. बिलंग, ता. कामा, जि. भरतपुर, राजस्थान) इर्शाद ताजमोहमंद मेह (वय ३०, रा. उंबरी, ता. फिरोजपुर, जि. नुह, हरियाना) अशोक पोपट पारे (वय ४७ वर्षे, रा. मु. पो. मिरजगांव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) रखमाजी लक्ष्मण मगर (वय ३४ रा. पाटेगांव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) कालीदास बाबुराव काकडे (वय ६३, रा. मु.पो. सावडी, ता. करमाळा, जि. सोलापुर ) आसिफ पप्पु मेव (वय २६ रा. आकेडा, ता. नुह, हरियाणा) जमशेर अब्दुल रज्जाक खान (वय ४५ रा. करवडी, ता. पुनाहना, जि. मेवाद, हरियाना) सचिन जिजाबा माने ( वय ३९ रा. ५०० बंगला, शेजारी, केडगांव, जि. अहिल्यानगर)

ट्रकमध्ये लाल सुपारी व तंबाखू असल्याचे दिसन आले. चालकांकडे त्यांचे ताब्यातील सुपारी व तंबाखूबाबत विचारपुस करता त्यांनी सदरची सुपारी व तंबाखु ही वाहन मालक मोहंमद अक्रम रा. कर्नाटक याची असून त्यांचे सांगणेप्रमाणे सदरची सुपारी व तंबाखु हो गुजरात राज्यामध्ये गुटखा बनविण्यासाठी नेत असल्याचे सांगितले, त्यांचेकडे सुपारी व तंबाखू वाहतुक परवान्याबाबत बाबत विचारपूस करता त्यांचेकडे कोणतेही ई वे बिल मिळून आले नसुन बिल्टीची पाहणी करता सदरची बिल्टी ही संगणीकृत नसुन हस्तलिखीत बनावट तयार करण्यात आल्याचे व माल पोचविण्याचा पत्ता दिल्ली असा नमूद केलेला आहे. त्यामुळे वरील ट्रक चालकांकडे मिळून आलेली सडलेली लाल सुपारी व तंबाखु ही कर चुकवून व बनावट बिले तयार करुन आणली असल्याची प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने ६,१७,८५०००/- रुपये किमतीची २.०५.९५० किलो लाल सुपारी, १५,६०,०००/- रुपये किमतीची ७८०० किलो तंबाखु व २.१०,००,०००/- रुपये किमतीचे १३ वाहने असा एकुण ८.४३.४५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन मिळुन आलेली सुपारी व तंबाखु बाबत खात्री करुन कारवाई करणेबाबत राज्य कर सह आयुक्त, वस्तु आणि कर सेवा विभाग अहिल्यानगर यांना पत्रव्यवहार करण्यात आला असुन पुढील कारवाई वस्तु आणि कर सेवा विभाग अहिल्यानगर यांचे मार्फतीने करण्यात येत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular