Homeक्राईमगंभीर गुन्ह्यातील आरोपी डॉक्टर अकरा दिवस झाले तरी पोलिसांना सापडेना...आरोपी सोडून साक्षीदारांवर...

गंभीर गुन्ह्यातील आरोपी डॉक्टर अकरा दिवस झाले तरी पोलिसांना सापडेना…आरोपी सोडून साक्षीदारांवर दबाव तपासी अधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल करणार.. अशोक खोकराळे

advertisement

अहिल्यानगर दिनांक २९ ऑक्टोबर
कोरोना काळात घसा दुखत असल्याचा इलाज करण्यासाठी गेलेल्या रुग्णाचा कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचा खोटा रिपोर्ट बनवून, त्यातही पुढे चुकीचे उपचार दिले. यात रुग्णाचा मृत्यू झाला. हा प्रकार मृत्यूपर्यंत न थांबता, मृताच्या अवयवांची तस्करीसाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल झालेले डॉक्टर अद्यापही अटक झालेले नाही या प्रकरणातील फिर्यादी अशोक खोकराळे पाच वर्षे पाठपुरावा करत होते अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याची दखल घेत, अहिल्यानगर शहरातील पाच नामांकित डाॅक्टारांसह एका अनोळखी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता त्या नंतर अहिल्यानगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात न्युक्लिअस हॉस्पिटलचे डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. सुधीर बोरकर (रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी), डॉ. सचिन पांडुळे, डॉ. अक्षयदीप झावरे, डॉ. मुकुंद तांदळे (सर्व रा. नगर) आणि डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल लॅबचे तज्ञ डॉक्टर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर हा गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. कटकारस्थान, फसवणूक, आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Oplus_131072

या प्रकरणाचा तपास तातडीने अहिल्यानगर शहराचे नव्याने नियुक्त झालेले शहर पोलीस उपाधीक्षक दिलीप टिपरसे यांच्या कडे सोपवण्यात आला आहे. तपासाच्या दृष्टिकोनाने पोलीस उपाधीक्षक दिलीप टिपरसे यांनी महानगरपालिकेकडे विविध कागदपत्रांची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणातील साक्षीदारांची जबाब नोंदवण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती समोर आली असून.
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अशोक खोकराळे हे तपासाबाबत असमाधानी असून दहा दिवस उलटून नाही आरोपी अटक होत नाहीत उच्च न्यायालयाने दिलेले आदेशात सर्व काही नमूद असताना पुन्हा तपासाच्या नावाखाली वेळ काढू पणा सुरू असल्यामुळे आता तपास अधिकाऱ्यांच्या विरोधात रेकॉर्डसह साक्षीदारांनासह उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात तक्रार दाखल करणार असल्याची खात्रीशीर माहिती, मिळाली आहे.तपासी अधिकारी या प्रकरणातीलआरोपींना अटक न करता साक्षीदारांवर दबाव टाकत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

तपासातील विश्वासार्था राहिली नसल्याचे फिर्यादी अशोक खोकराळे यांचे मत असून सदर गुन्ह्यातील तपासातून बाजूला होऊन पुन्हा उच्च न्यायालयाच्या समोर सध्याची संपूर्ण वस्तुस्थिती दाखवून जी याचिका दाखल आहे त्याच याचिकेत न्याय मिळवा म्हणून पुन्हा विनंती करणार असल्याची भूमिका फिर्यादी अशोक खोकराळे यांनी घेतली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular