आसाम दिनांक 10 जानेवारी
केंद्रीय राखीव पोलीस दल(CRPF) मध्ये सहायक कमांडंट या पदावर कार्यरत असलेले व सध्या आसाम मध्ये CRPF च्या क्विक ॲक्शन टीम (QAT) चे कमांडर म्हणून काम करत असलेले नगरचे सुपुत्र श्री अमित महादेव काकडे यांना ULFA-I या उग्रवादी संघटने विरुद्ध केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल CRPF महानिदेशक डिस्क व प्रशंसा पत्र घोषित झाले आहे.
अमित काकडे यांनी मार्च २०२४ मध्ये ULFA -I उग्रवादी संघटनेतील एक हत्यार बंद उग्रवादी पकडुन या संघटनेविरुद्ध मोठी कामगिरी बजावली होती. या साठी त्यांना CRPF ने महानिदेशक डिस्क व प्रशंसा पत्र घोषित केले आहे. आसाम व नागालँड या राज्यांमध्ये उग्रवादी संघटने विरुद्ध कार्यवाही, तसेच ड्रग्स तस्करी चे नेटवर्क मोडून काढणे, असे काम अमित काकडे CRPF च्या क्विक ॲक्शन टीम (QAT) चे कमांडर म्हणून करत आहेत.