अहमदनगर दि .६ सप्टेंबर
दहशदवाद्यांचा मास्टर माईंड झाकीर नाईक यांच्या कडून अडीच कोट रुपयांची मदत आपल्या शिक्षणसंस्थांसाठी घेऊन आपल्या शिक्षण संस्था जे चालवत आहेत त्यांनी उंटांचा मुका घेण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा नगरमध्ये आल्यानंतर शिवसैनिक आपला इंगा दाखवतील असा इशारा शिवसेना उप जिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना दिला आहे. याबाबत त्यांनी पत्रक प्रसिद्धीला दिले आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन सुपुत्र उदयनिधी स्टॉलीन यांच्या हिंदू धर्माबद्दलच्या बेताल वक्तव्यावरून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी निषेध पत्रक काढले आहे. त्यात त्यांनी माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले आहे. उद्यानिधी स्टालिन यांनी सनातन धर्माबद्दल जे वक्तव्य केले त्याचा समाचार घेतांना त्यांनी स्टॅलिन यांना मेंदूज्वर झाल्याचे हे लक्षण असल्याचे म्हंटले. जिहादी प्रवृत्तीच्या या वक्तव्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचे सांगत महाराष्ट्रातील इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून त्यांनी याचा खुलासा मागितला एवढ्यावरच ते थांबले असते तर ठीक होते मात्र त्यांनी या वादात आमचे नेते उद्धव साहेबांना विनाकारण ओढले. उद्यानिधीचे वडील आता ज्या आघाडीत सहभागी झाले आहेत. त्या आघाडीचे नेतृत्व करायला उद्धव ठाकरे निघाले आहेत. स्टालिन यांच्या वक्तव्याच्या मान्यतेचा खुलासा त्यांनी उद्धव ठाकरे यांना मागितला. वास्तविक वेळोवेळी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षांतर करणाऱ्याना आणि भारतातून कारवाईच्या भीतीने परागंदा झालेला कुख्यात दहशदवादी झाकीर नाईक यांच्याकडून थोडी तिडकी नव्हे तर तब्बल दोन ते अडीच कोटी रुपयांची मदत घेणाऱ्यांना हा खुलासा मागण्याचा अधिकारच नाही . आमच्या पक्ष नेतृत्वावर टीका करून वड्याचे तेल वांग्यावर काढणाऱ्यांनी उंटांचा मुका घेण्याचा प्रयत्न करून नये असा सल्ला गिरीश जाधव यांनी दिला आहे.
या पत्रकात त्यांनी पुढे म्हंटले आहे की केवळ सत्तेसाठी प्रत्येक निवडणुकीत नव्या पक्षाची माळ घालून आपली खुर्ची आणि पद शाबूद ठेवण्याचा प्रयत्न विखे करतात. या अगोदर काँग्रेस मध्ये त्या अगोदर ते शिवसेनेत देखील ते होते. जिथे सत्ता तिथे विखे हे तर त्यांच्या राजकारणाचे सूत्र. वास्तविक सत्तेशिवाय विखे घराणे राहूच शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. शिवसेनेत असताना आपण पिता पुत्र मंत्री होता. अर्ध्याच प्रवासात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा घेऊन आपली त्या वेळेस उचलबांगडी केली. हा इतिहास जनता विसरू शकत नाही. आणि आता त्यांनीच हिदुत्व आम्हाला शिकवावे , हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व आमच्या नसानसात भिनलेले आहे. उद्यानिधी स्टॉलीन याने जे वक्तव्य केले त्यावर त्याच्या नावाने खडे फोडायचे सोडून आमच्या नेतृत्ववाबद्दल शंका घेण्याचा अधिकार आपण आधीच गमावलेला आहे. ज्यावेळी आपले सुपुत्र भाजपाच्या तिकिटावर खासदारकीच्या तिकिटावर लढत होते. तेव्हा राज्यात आपण काँग्रेस पक्षाचे विरोधीपक्ष नेते होतात. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देखील आपल्याच घरात होते. सुपुत्र इकडे आले मग ही दोन्ही पदे मुदत संपूपर्यंत सोबत ठेवण्यात आपला काय स्वार्थ होता हे जनतेला माहित झाले आहे.
केवळ सत्तेसाठी स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षाचा विचार आपण स्वीकारला आहे हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे. या अगोदर आपण काँग्रेस पक्षात असतांना आपण भाजपाचा हिंदुत्ववाद कसा बेगडी आहे हे सांगणारी हजारो वक्तव्ये आहेत. त्या बातम्यांच्या आणि चॅनल ला दिलेल्या बाइट्स च्या लिंक आम्ही शोधू आणि सोशल मीडियावर व्हायरल करुन केवळ सत्तेसाठी आपल्याला आलेला हिंदुत्वाचा कळवळा आम्ही जनतेला दाखवू असे ते म्हणाले