मुंबई – २३ सप्टेंबर
Dasara Melava : दसरा मेळाव्यावरून सध्या राडा सुरु आहे, त्यात यंदाच्या मेळाव्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाणार आहेत. पण दसरा मेळ्यावा शिवजी पार्कमध्ये कोण घेणार? याचा वाद हायकोर्टात पोहचला होता. एकनाथ शिंदे गट, उद्धव ठाकरे आणि बीएमसीमार्फत तिन्ही बाजू हायकोर्टानं ऐकून घेतल्या गेल्या. आणि अखेर या प्रकरणी सदा सरवणकर यांची शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्यासाठीची हस्तक्षेप याचिका हायकोर्टानं फेटाळली, एकानथ शिंदे गटाला हायकोर्टाचा दणका समजावा लागेल आणि
शिवसेनेला शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्याची परवानगी आम्ही देत आहोत असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.